लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : नगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती
करोना काळात संकटात सापडल्या आहेत. सर्व बाजार समितींना अडचणीतून व संकटातून बाहेर
काढण्यासाठी प्रथमच सर्व बाजार समितींच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन केले
आहे. बाजार समितींचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठक उपयुक्त ठरणार आहे,
असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले.
चंद्रशेखर बारी म्हणाले, जिल्ह्यतील बाजार समितींच्या कामकाजाची
सविस्तर माहिती घेवून प्रश्न समजावून घेतली आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या
व महाराष्ट्र राज्य कृषी पणम महामंडळाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना बाजार समितीच्या
मार्फत राबवल्या जातात त्यांच्या प्रभावी अमलबजावणी साठी सूचना केल्या आहेत. या
आढावा बैठकीतून बाजार समितींचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने पुढील काळात सर्व
बाजार समिती चांगले काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले,
बाजार समितींचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमच आढावा बैठक
उपनिबंधक कार्यालयाने घेतल्याबद्दल त्यांचे आभार. करोना काळात सर्व बाजार
समितींच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाचा विचार न करता शेतकऱ्यांचे मालाचा लिलाव
केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्व बाजार समितींच्या सर्व
कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन करोना वॉरियर म्हणून घोषित करावे, अशी
मागणी करून सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या