महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेना कडून पुष्पाताई बोरुडे तर राष्ट्रवादी कडून उपसभापती पदासाठी मीनाताई चोपडा यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले ( फोटो - राजू खरपुडे ,नगर)
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: मनपाच्या महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक दि.१५ सप्टेंबर रोजी पीठासीन अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून आज शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पाताई बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेंनप्पा,नगरसेविका सुरेख कदम व अनुमोदन कमळ सप्रे,शांताबाई शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीनाताई चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभाताई बोरकर हे आहेत .
0 टिप्पण्या