Ticker

6/Breaking/ticker-posts

ग्रामीणमधील 'पॉजिटीव्ह' नोंद शहर यादीत झाली; शहरवासीयांनी काळजी करू नये.आयुक्त- शंकर गोरे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

हमदनगर: कोरोना चाचणी अहवाला नंतर येणाऱ्या नोंदी पोर्टल वर त्या त्या भागा नुसार नोंदल्या जातात.आज अहमदनगर शहरात ६४ रुग्ण ही संख्या चुकून नोंदविली गेली असून अहमदनगर शहरात आज फक्त ०५ रुग्णांची नोंद झाली आहे.तरी अहमदनगर शहरातील नागरिकांनी काळजी करू नये असे अवाहन अहमदनगर महानगरपालिका आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील आकडेवारी चुकून नगर शहरात नोंदविली गेल्या मुळे ६४ रुग्णांची नोंद दिसते आहे. उपायुक्त श्री.यशवंत डांगे आणि आरोग्य अधिकारी डॉ.श्री.सतीश राजूरकर यांनी तातडीने रुग्णांची नावे तपासली असता इतर तालुका भागातील रुग्ण आकडेवारी शहर आकडेवारीत नोंदली गेल्याचे निदर्शनास आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या