Ticker

6/Breaking/ticker-posts

शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग ऑनलाईन सुरू; प्रवेशाचे आवाहन

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : नाशिक विभाग ग्रंथालय संघ संचलित शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग  ऑनलाईन सुरू झालेले असून कोरोमामुळे घरबसल्या हा कोर्स करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, मर्यादित प्रवेश शिल्लक असून इच्छुक उमेदवारांनी थेट स्वस्तिक सार्वजनिक वाचनालय, पाथर्डी  जि.- अ. नगर येथे त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक संदीप काटे यांनी केले आहे.

ग्रंथपालन कोर्स हा शासनमान्य असून शाळा, महाविद्यालय, तसेच सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या ग्रंथपालांना या कोर्सची अनिवार्यता असते. किंबहुना किमान पात्रता गणली जाते. त्यामुळे या कोर्सला मोठी मागणी असते.  या कोर्सचा ३ महिने कालावधी असला तरी कोरोनामुळे तो ऑनलाईन करता येणार आहे. त्यामुळे या संधीचा इच्छुक  उमेवारांनी लाभ घ्यावा व प्रवेश अर्ज करणेसाठी खालील लिंकवर सर्च करावे.

 लिंक-  https://forms.gle/rmavf64nRujNT7XUA

लिंक वर आपला अर्ज सादर करावा व अधिक  माहितीसाठी स्वतः स्वस्तिक सार्वजनिक वाचनालय, पाथर्डी येथे भेटावे. किंवा   मो. 7588006991/ 7720937105  संपर्क साधावा असे आवाहन कोर्सचे संचालकांनी केले आहे.


_-----------------------------------------

*ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग 2021-22*

मर्यादित प्रवेशासाठी संपर्क -

स्वस्तिक सार्वजनिक वाचनालाय. पाथर्डी जिल्हा -अहमदनगर 

संपर्क -7588006991,7720937105.

टीप -सोबत दिलेल्या गुगल लिंक वर फॉर्म भरून आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा.🙏

लिंक-  https://forms.gle/rmavf64nRujNT7XUA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या