Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगरच्या इंटेरिअर डिझायनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित लोटके, तर सचिवपदी सागर कंदुर

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर - इंटेरिअर डिझायनर्स असोसिएशन, अहमदनगरची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा रोहित लोटके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. आय.डी.ए.ए.च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सर्वानुमते रोहित लोटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कविता पहुजा, तर सचिवपदी सागर कंदुर, तसेच खजिनदारपदी व्रजेश शहा व सहसचिवपदी चेतन वाडेकर यांची निवड करण्यात आली. संचालकपदी महेश बालटे, सचिन झुंजुर, विशाल दगडे, अंकुर सुपेकर, सौरभ गुगळे, विनायक गोसके, निखील गारुडकर, अमृत सद्रे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अवतारसिंग हिरा यांनी काम पाहिले. यावेळी असोसिएशनच्या वतीने नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारास उत्तर देताना अध्यक्ष रोहित लोटके म्हणाले की, असोसिएशनच्या माध्यमातून इंटेरिअर डिझायनर यांचे प्रश्न सोडविण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, तसेच भारतातील नामवंत आर्किटेक्ट व इंटेरियर डिझायनर्स यांना नगरमध्ये आमंत्रित करून त्यांचे चर्चासत्र सभासदांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाईल. त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवू, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कंदुर यांनी केले, तर अंकुर सुपेकर यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या