Ticker

6/Breaking/ticker-posts

शाळा सुरु झाल्यानंतर चांगले शैक्षणीक वातावरण निर्माण करा : नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस

 


लोकनेता
  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर :  शिक्षण विभागात नगर जिल्हा राज्यात अग्रक्रमाणे पुढे आहे. शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांना बरोबर घेवू. एकमेकात समन्वय ठेवून काम करू. विद्यार्थ्याच्या आरोग्याला अधिक महत्व देण्याचे शासनाचे धोरण असल्याने अद्याप शाळा सुरु होणार नाहीत. भविष्यात शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थी शाळेत येण्यासाठी चांगले शैक्षणीक वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांच्या मनात शाळा व शिक्षकांप्रती प्रेम निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी मुख्याध्यापकांची महत्वाची भूमिका आहे. जिल्ह्याचा मुख्याध्यापक संघ अनेक वर्षापासून चांगले काम करत आहे. या संघास माझे पूर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन नव्याने रुजू झालेले माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले.

            नगर जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस व नूतन उप शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सत्कार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील पंडित यांनी केला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास संघाचे सचिव बाळासाहेब कळसकर, उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, निवृत्ती इले, राजेंद्र वाघ आदींसह जिल्हा पदाधिकारी व तालुक्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात नव्याने मुख्याध्यापक पदी नियुक्ती झालेल्यांचा सन्मान करण्यात आला.

            उप शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले, शिक्षण विभागात काम करताना मुख्याध्यापक व शिक्षकांप्रती आदर ठवत काम करत आहे. सर्वाची मिळत असलेल्या साथी मुळेच मी चांगले काम करू शकत आहे.

            प्रास्ताविकात प्रा.सुनील पंडित म्हणाले, नगर जिल्ह्याचे सुपुत्र नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी या पूर्वी नगर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक विभागात व नंतर कोकणामध्ये खूप चांगले काम केले आहे. नगर जिल्ह्याची माहिती असल्याने ते नगरमध्येही गुणवत्ता वाढीसाठी चांगले उत्कृष्ठ काम करतील. सर्व नियमांचे पालन करत लवकरात लवकर शाळा सुरु होणे आवश्यक आहे.

कार्याक्राचे सूत्रसंचलन बाळासाहेब कळसकर यांनी केले. ज्ञानदेव बेरड यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानदेव बेरड,  बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब रोहाकले, कैलास साठे, शीतल बांगर आदी उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या