लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड: जामखेड तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार
संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी दीपक देवमाने,उपाध्यक्षपदी अविनाश ढवळे तर सचिवपदी दैनिक
प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र
राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे.जिल्हाध्यक्ष दत्तात्रय
पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी इकडे यांच्या
अध्यक्षतेखाली जामखेड येथे रविवार (ता.26) रोजी आयोजित
केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी वसंत
सानप, दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी प्रकाश खंडागळे,
दैनिक पुढारीचे लियाकत शेख.नगर व्हिजनचे संपादक संजय वारभोग दैनिक
सकाळचे खर्डा प्रतिनिधी डाॅ धनंजय जवळेकर दैनिक एकमतचे विजय राजकर,पत्रकार निलेश वनारसे.एफ एम स्टर न्युजचे संपादक फारूकभाई शेख दैनिक
प्रभातचे रिजवान शेख दैनिक पुढारीचे सचिन आटकरे. कायदेशीर सल्लागार अॅड प्रमोद
राऊत अॅड जैद सय्यद. आदि उपस्थित होते.
यावेळी
अध्यक्षपदासाठी दिपक देवमाने यांच्या नावाची सूचना ओंकार दळवी यांनी मांडली तर
लियाकत शेख यांनी अनुमोदन दिले. सचिव पदासाठी ओंकार दळवी यांच्या नावाची सूचना
शिवाजी इकडे यांनी मांडली तर अनुमोदन प्रकाश खंडागळे यांनी दिले. तदनंतर सर्व
सदस्य पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते
अन्य कार्यकारणी निश्चित करून जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्षपदी
अविनाश ढवळे तालुका संघटकपदी अक्षय ठाकरे. सहसचिव शंकर कुचेकर. खजिनदार मनोज
कोळपकर. कार्याध्यक्ष रामहरी रोडे. प्रसिद्धीप्रमुख तानाजी पवार अशी निवड करण्यात
आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नुतन
पदाधिकार्यांच्या निवडीनंतर आमदार रोहित पवार माजी मंत्री राम शिंदे यांनी अभिनंदन
केले आहे.
0 टिप्पण्या