Ticker

6/Breaking/ticker-posts

उत्तर प्रदेश निवडणूकः भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची खेळी

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबईः भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात शिवसेने उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी पत्रक जारी केलं आहे.

उत्तर प्रदेशामध्ये २०२२ ला उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुक आहे. शिवसेनेनाही या निवडणुकीतून उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरणार आहे.  शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारणीच्या बैठकीत सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निवडणुकांसाठी शिवसेनेनं अद्याप कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही.शिवसेनेनं ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. अद्याप पक्षानं कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र, भविष्यात युती होण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या या घोषणेवर भाजपची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेना उत्तर प्रदेशमधील जनतेचा आवाज बनून त्याच्यामध्ये जाणार. शिवसेना सर्व जागांवर उमेदावर उतरवून भाजपाला धडा शिकवणार आहे. सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्ष बांधणीसाठी समन्वयक नियुक्त करण्यात आलेत. लवकरात लवकर उत्तर प्रदेशमधील शिवसेना नेत्यांचं एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या निवडणुकीसंदर्भात अहवाल त्यांना सादर करणार आहे, असं शिवसेनेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या