Ticker

6/Breaking/ticker-posts

अफगाणिस्तान : तालिबानच्या सरकारची घोषणा; मुल्ला हसन अखुंद होणार पंतप्रधान



 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारचे खाते वाटप जाहीर झाल्याचे वृत्त आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा तालिबानी सरकारचा पंतप्रधान असणार आहे. तर, सिराज हक्कानी हा देशांतर्गत बाबींचा मंत्री असणार आहे. मुल्ला याकूब याच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी असणार आहे.

मुल्ला हसन अखुंद हा तालिबानी सरकारचा पंतप्रधान असणार आहे. तर, अब्दुल गनी बरादर हा उपपंतप्रधान असणार आहे. खैरउल्लाह खैरख्वा हा माहिती प्रसारण मंत्री असणार आहे. अब्दुल हकीम याच्याकडे न्याय मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. तर, शेर अब्बास स्टैनिकझाई हा उपपराष्ट्र मंत्री असणार आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद हा माहिती मंत्रालयाचा उपमंत्री असणार आहे.

मुल्ला हसन हा जवळपास २० वर्षांपासून शेख हैबतुल्ला अखुंझादाचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. मुल्ला हसनने अफगाणिस्तानमधील तत्कालीन सरकारमधील महत्त्वाच्या पदावर काम केले होते

मुल्ला याकूब हा मदरशामध्ये शेख हैबतुल्लाह अखुंझादा याचा विद्यार्थी होता. शेख हबीबु्ल्लाहनेच मुल्ला याकूब याला सशस्त्र सैन्याचा कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त करण्यात आला होता.

तालिबान अफगाणिस्तानमध्ये इराण मॉडेलच्या आधारावर सरकार तयार करत आहे. इराण हा एक शिया मुस्लिम बहुल असून इस्लामिक प्रजासत्ताक देश आहे. अफगाणिस्तानमध्येही अशीच शासन व्यवस्था दिसू शकते. मुल्ला अखुनझादा हा अफगाणिस्तानचा सुप्रीम लीडर असणार. सुप्रीम लीडर हा देशाचा प्रमुख असतो. अखुनझादा हा कंदाहारमध्ये वास्तव्य करणार. तर, अफगाणिस्तान सरकारचे मंत्रिमंडळ काबूलमधून सरकार चालवतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या