Ticker

6/Breaking/ticker-posts

चांदा येथील दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद..!



 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



नगर : नेवासा तालुक्यातील चांदा येथे १९ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या दरोड्याच्या घटनेतील तिघा आरोपींना अटक करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाला यश आले. तिघेही आरोपी नेवासा तालुक्यातील आहेत या सर्वांना नेवासा न्यायालयात हजर केले असता सहा सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की. २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चांदा येथील रामायणाचार्य अडभाई महाराज व नारायण गायकवाड,  किसन गायकवाड यांच्या वस्तीवर दरोडा पडला . यात सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या व स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावर असलेल्या सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांनी ओळखल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार सुनील चव्हाण , दत्तात्रय इंगळे आदींनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपींचा छडा लावला.


या गुन्ह्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले( रा. मुकिंदपुर,) सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले (रा. गेवराई ता नेवासा) व पंकेश उर्फ पक्या जगताप भोसले ( रा. फत्तेपूर ता नेवासा) यांना अटक करण्यात आली. आरोपी विरुद्ध नेवासा शिर्डी व वांळूज  पोलिस ठाण्यात  गुन्हे दाखल आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या