Ticker

6/Breaking/ticker-posts

रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या चि.दिपेश पांडव व कु.स्नेहल चिंचकर यांचे घवघवीत यश








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जामखेड:  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी सञाच्या बीएचएमएस द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षेत जामखेड तालुक्यातील  रत्नापूर  येथील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे चि. दिपेश पांडव व कु. स्नेहल चिंचकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. 


जामखेड जिल्हा अहमदनगर येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड हे महाविद्यालय चालविले जाते.    रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर येथे गुणवत्ता पूर्ण शिक्षणा बरोबरच विद्यार्थी विद्यार्थीनींच्या व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. 



कोरोना आपत्तीच्या काळात संस्थेमार्फत जामखेड कर्जत तालुक्यातील लोकांसाठी विविध कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. संस्थेमार्फत शंभर बेडेड कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या मार्फत लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. 


गुणवंत विद्यार्थ्यांचे रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील व सचिव डॉ सौ वर्षा भास्करराव मोरे पाटील यांचेसह प्राचार्या डॉ. राजेश्वरी रापटा,प्रोफेसर डॉ. निर्मला ओव्हळ,प्रोफेसर डॉ.खान,डॉ.सौ.झेबा शेख,डॉ. बिपीन लाड, डॉ.संदिप सांगळे,डॉ. दिपाली सांगळे आदींचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्करराव मोरे पाटील व सचिव डॉ सौ वर्षा भास्करराव मोरे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या