लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड :जामखेड भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.यावेळी खड्डे बुजविण्यासाठी भाजप आक्रमक झाले असून हे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.
जामखेड शहरांमध्ये नगर रोड तसेच बीड रोड व करमाळा रोड येथील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. जामखेड मधील तसेच जामखेड- करमाळा रोड, जामखेड- बीड रोड आणि जामखेड- अ.नगर रोड या सर्व रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे रस्ते खराब असल्यामुळे वाहन चालवताना वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. रस्ते दुरुस्ती न केल्यास जिवित हानी देखील होऊ शकते सदरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास होणाऱ्या जिवित हानीस सार्वजनीक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. .तरि सार्वजनिक बांधकाम विभागाने जामखेड परिसरातील सदरील रस्त्यांचे १० दिवसात खड्डे दुरुस्ती झाली नाही तर सबंधीत अधिकारी यांच्या तोडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला.
या साठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जामखेड नगर रोड वरील पुलाजवळील रस्त्यातील खड्यामधे वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले.यावेळी पं स सदस्य डॉ भगवान मुरुमकर, सलिम बागवान, युवामोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले,उपाध्यक्ष मोहन गडदे,उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे,,शहर अध्यक्ष आभिराजे राळेभात, अर्जुन म्हेत्रे प्रविण सानप, काशिनाथ ओमासे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, जिल्हा चिटणीस महेश मासाळ,नगरसेवक संदीप गायकवाड, गणेश आजबे, तात्याराम पोकळे, ईश्वर हुलगुंडे मोहन देवकाते, सह आदी मान्यवर उपस्थित होते.
खड्डे बुजविण्यास सुरुवात.
सार्वजनीक बांधकाम विभागाने जामखेड - करमाळा रस्त्यावरील आय टी आय रस्त्यातील वरील पुलावरील खड्डे बुजविण्यास आले आहेत.तसेच जामखेड - खर्डा रस्त्यावरील देखील खड्डे बुजविण्यास देखील सुरुवात केली आहे.त्यामुळे तालुक्यातील व शहरातील रस्त्याचे लवकरच खड्डे बुजविण्यास येतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या