Ticker

6/Breaking/ticker-posts

११ टक्के महागाई भत्त्याची वाढ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना मिळावी -बाबासाहेब बोडखे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात झालेली अकरा टक्के वाढ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना द्यावी व महागाई भत्तेची थकबाकी दिवाळीपूर्वी रोखीने देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कार्याध्यक्ष आनंद शर्मा यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात अकरा टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना 1जानेवारी 2020 पासून चार टक्के,१जुलै २०२०पासून तीन टक्के तर १ जानेवारी२०२१पासून चार टक्के असा एकूण अकरा टक्के एवढी महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता वाढ देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र हा निर्णय उशिरा होत असल्याने थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अकरा टक्के वाढीव महागाई भत्ता तसेच जुलै ते सप्टेंबर थकबाकी दिवाळीपूर्वीच रोखीने देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

या मागणीसाठी  शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, अशोक झिने, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, शुभांगी थोरात, विनिता जोशी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, संदीप झाडे, राहुल ज्योतिक, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, जालिंदर शिंदे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या