Ticker

6/Breaking/ticker-posts

विराटचा विश्वविक्रम; सचिनसह ७ दिग्गजांना मागे टाकले

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराटने एक धाव घेताच विक्रमला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हल मैदानावर चौथी कसोटी सुरू झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पहिल्या सत्रात भारताने ३ बाद ५४ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा ११ , केएल राहुल १७ तर चेतेश्वर पुजारा ४ धावांवर बाद झाले.

भारतीय डावात विराटने वैयक्तीक एक धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या २३ हजार धावा पूर्ण झाल्या. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी अशी कामगिरी केली आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ हजार ३५७ धावा तर राहुल द्रविडच्या नावावर २४ हजार ६४ धावा आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली आता सातव्या क्रमांकावर आहे. हा विक्रम करताना विराटने आणखी एक पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २३ हजार धावा करण्याचा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केलाय.

विराटने फक्त ४९० आंतरराष्ट्रीय डावात २३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सचिनने ५२२ डावात २३ हजार धावा केल्या होत्या. तर रिकी पॉन्टिंगने ५४४ डावात ही कामगिरी केली होती. जॅक कॅलिसने ५५१ डावात आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ५६८ डावात २३ हजारचा टप्पा पार केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या