Ticker

6/Breaking/ticker-posts

२३ सप्टेंबरला उकांडा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन - माजी सरपंच अंकुश कासुळे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार  : भालगाव पंचायत समिती गणातिल विविध प्रश्नाबाबत गुरुवारी दि. २३ सप्टेबंरला  सकाळी १० वाजता उकांडा फाटा येथे  रस्ता रोखो अंदोलन करण्यात येणार असल्याचा  इशारा भालगावचे   माजी सरपंच  अंकुश कासुळे यांनी दिला आहे .

मागील आठवड्यात भालगाव गणा मध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे . 

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळावी तसेच  मागील वर्षी अतिवृष्टी होऊन ही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही . खरवंडी ते  लोहा राष्ट्रीय महामार्गाचे काम एकदम धीम्या गतीने चालू आहे . या  रस्ता  ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांचे  प्रचंड नुकसान झाले आहे ठिकठिकाणी  साईड  गटार नसल्यामुळे शेत जमीन व शेतीचे मालाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा .

 या भागामध्ये वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे , महामार्ग  पासून शंभर फूट रस्ता कॉंक्रिटीकरण करून द्यावा . व शेतकऱ्यांना शेती मध्ये जाण्याकरता रस्ता करून द्यावा  पैठण पालखी रोड ७५१ मधील शेतकऱ्यांना  मावेजा मिळाला नाही तो  अदा करण्यात यावा रस्त्याच्या कडेला असणारी घरे रस्त्याची उंची वाढल्याने  घरे रस्त्या पेक्षा खाली गेली आहे त्यामुळे घराकडे जाण्यासाठी  रस्ता करून द्यावा  गेली तीन वर्ष अतिवृष्टी होऊन ही  शेतकऱ्यास विमा कंपनीकडून  एकही रुपया मिळाला नाही .

विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळवून द्यावी  सातबारा ऑनलाइन पिक पेरा लावण्यासाठी शासनाने शेतकऱ्यास ऑनलाइन करणे बाबत कळविले आहे परंतु ९० % शेतकरी अडाणी आहेत तसेच शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल नाही इंटरनेट बाबत माहिती नाही त्यामुळे पिक पेर  ऑनलाईन करता येत नाही तेव्हा शासनाने कामगार तलाठी यांनाच पूर्वीप्रमाणे सातबारा ऑनलाइन करण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी लोकशाही मार्गाने २३/०९/२०२१ रोजी सकाळी  उकंडा फाटा भालगाव येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत असा इशारा भालगाव चे  माजी सरपंच अंकुश कळसे यांनी दिला आहे याबाबत त्यांनी सबंधीत सर्व प्रशासणास निवेदन दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या