Ticker

6/Breaking/ticker-posts

तालिबानविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढणार : मसूद

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे पंजशीरच्या बंडखोरांकडून अजूनही संघर्ष सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता बंडखोर नेता मसूद अहमदने एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. पंजशीरमध्ये अजूनही विद्रोही सैन्य असून तालिबानविरोधात संघर्ष संपला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मसूद यांनी अफगाणिस्तानच्या सर्व नागरिकांना तालिबानविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. पंजशीरचे विद्रोही सैन्य तालिबान विरोधात लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्रोही सैन्य अजूनही पंजशीरच्या खोऱ्यात असून तालिबानशी दोन हात करत आहेत. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करणार असून पराभव मान्य करणार नसल्याचे मसूद यांनी म्हटले.

फहीम दश्ती आणि मसूद याचे निकटवर्तीय हवाई हल्ल्यात ठार झाले. मसूद यांनी ऑडिओ मेसेजमध्ये तालिबानसोबत पाकिस्तानला यासाठी जबाबदार ठरवले आहे. पाकिस्तानने थेट पंजशीरमध्ये अफगाण नागरिकांवर हल्ला केला. ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय पाहत आहे. सध्या आमची लढाई तालिबानसोबत सुरू नसून पाकिस्तानी लष्करासोबत आणि आयएसआय सोबत सुरू आहे. तालिबानचे नेतृत्व पाकिस्तान करत असल्याचा दावा मसूद अहमद यांनी केला

तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, मात्र पंजशीर प्रांतावर विजय मिळवता आला नव्हता. तालिबानने पंजशीरचा विजय प्रतिष्ठेचा केला. त्यानंतर १० हजारांची फौज अमेरिकन शस्त्रांसह पाठवली होती. रविवारी रात्री पाकिस्तानी आणि तालिबानी सैन्याने पंजशीर खोऱ्यात जोरदार हल्ला केला. यामध्ये बंडखोरांचे नेते अहमद मसूद यांना धक्का बसला. मसूद यांचे निकटवर्तीय आणि प्रवक्ते फहीम दश्ती आणि कमांडर जनरल साहिब अब्दुल वदूद झोर ठार झाले. तालिबानी फौजांनी पंजशीरमधील अहमद मसूद यांचे घरही ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या