Ticker

6/Breaking/ticker-posts

ऑक्सिजन देणार्या झाडांचे वृक्षारोपण करावे - राजेंद्र बुंदेले

 *राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २७ वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून साजरा.                  



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : राष्ट्रीय चर्मकार महासंघामुळे अन्यायाविरोधात लढण्याची ताकद निर्माण होत असून समाजाला न्याय मिळत आहे,  करोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले, म्हणून शुद्ध ऑक्सिजन करिता वृक्षांची अतोनात गरज असल्याने ऑक्सिजन देणार्या झाडांचे वृक्षारोपण करावे असे आवाहन चर्मकार महासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांनी केले.            

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त नगर तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात ऑक्सिजन देणारे झाडाचे वृक्षारोपण तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

 बुंदेले पुढे म्हाणाले कि, चर्मकार समाजाच्या उन्नती आणि विकासाकरिता २४ सप्टेंबर १९९५ रोजी माजी समाजकल्याण मंत्री मा. बबनराव घोलप यांनी महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना केली होती. समाजातील प्रश्नांना व अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे, समाजाला एकत्रित करणे, आणि समाज विकास साधने अशा हेतुने प्रेरित होऊन संघटना वाढत गेली आणि कालांतराने महाराष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय चर्मकार महासंघात रूपांतर झाले. आज अभिमानाने सांगावेसे वाटते कि महासंघाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळत आहे,  अन्यायाविरोधात लढण्याची ताकद निर्माण होत आहे. कोरोणा सदृश परिस्थितीमध्ये ऑक्सिजन अभावी अनेकांचे हाल होताना आपण पाहिले आणि म्हणून शुद्ध ऑक्सिजन करिता वृक्षांची अतोनात गरज असल्याने ऑक्सिजन देणारे झाडे आणून त्यांचे प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे. यासाठी प्रशासनाने महासंघाला नेहमीच सहकार्य केले. त्यामुळे नगर तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करून संघटनेबद्दलचा उदात्त हेतू आम्ही समाजापुढे ठेवला आहे. बुंदेले यांनी सांगितले.

 या प्रसंगी सपोनि राजेंद्र सानप सानप म्हणाले की, प्रशासन नेहमी सर्वांना सहकार्य करते, इथून पुढील काळात पण सहकार्य करत राहील. सामाजिक जाणीवेच्या भावनेतुन काम करत राहील अशी ग्वाही दिली.

महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, खजिनदार संभाजी आहेर, सदस्य लक्ष्मण साळे, युवक उपाध्यक्ष संतोष त्रिंबके, शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, शहर जिल्हासचिव महेश आहेर, शहर जिल्हा उपाध्यक्ष दुर्वेश शेलार, विनोद काशीद, संजय अरणकल्ले, निलेश खांडरे आदी पदाधिकाऱ्यांसह, पोलीस उपनिरीक्षक जारवाल, चव्हाण, सहाय्यक फौजदार लबडे, ठाणे अंमलदार ठाणगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मरकड, गांगर्डे, पोलीस कॉन्स्टेबल टकले, जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या