लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी : राज्यातील ग्रंथालय
आणि ग्रंथालयीन कर्मचारी यांच्या मागण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊ असे अश्वासन विधानपरिषदेच्या
उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यानी पाथर्डीच्या
ग्रंथालय पदाधिकार्याना दिले. पाथर्डी
पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णूपंत पवार,ग्रंथालय समितीचे संजय कराळे यांनी ना. गोऱ्हे यांची पुणे निवासस्थानी प्रत्येक्ष भेटून त्यांच्या वाढदिवसानिमित्त
शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यानी आश्वस्त केले.
यावेळी
पवार आणि कराळे यांनी राज्यातील कार्यरत
ग्रंथालयांना वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिक आणि ग्रंथ देवघेव बरोबरच या ग्रंथालयात माहिती व सुविधा केंद्रात
परिवर्तन करुन कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र
आणि सेतू केंद्राची परवाना मिळावा, ग्रामपंचायत , नगरपालिका किंवा नगरपंचायत हद्दीतील ज्या ग्रंथालयांना स्वत:ची जागा नाही
त्यांना मोकळे भूखंड उपलब्ध करून देण्यात यावे , ग्रंथालय
अनुदान दुप्पट करावे , नवीन ग्रंथालय मान्यता देण्यात यावे .
मागील आर्थिक वर्षाचे थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे अशा विविध मागण्याचे
निवेदन डॉ.गोऱ्हे यांना देण्यात आले.
याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
त्यांनी यावेळी पवार आणि कराळे याना
दिले.
0 टिप्पण्या