लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मिरजगाव : सीना नदीच्या उगम
क्षेत्रात गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसाने सीना नदी दुथडी भरून वाहु लागल्याने कर्जत
तालुक्यातील सीना मध्यम प्रकल्पात आज अखेर ८० टक्के पाण्याची आवक झाल्याची माहिती शाखाधिकारी
प्रवीण भांगरे यांनी दिली.
त्यामुळे
सीना धरण लाभक्षेत्राखालील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कर्जत, सह
श्रीगोंदा व आष्टी तालुक्यातील शेतीची भिस्त सीना धरणावर असल्याने धरणाला पावसाची
मोठी प्रतिक्षा होती. गतवर्षी इतिहासात पहिल्यांदाच सीना धरण जुलै अखेर पूर्ण
क्षमतेने भरले होते. मात्र यंदा काही काळ सीना धरणाला पावसाची प्रतीक्षा लागली.
नगरसह
बहिरवाडी,
जेऊर परिसरातून पाण्याची मोठी आवक सीना धरणात होत आहे .
सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात
मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पिंपळगाव माळवी
तलाव ओव्ह्फ्लो झाला असून आता सीना धरण भरण्याची शक्यता बळावली आहे.
मागील
काही दिवसापासून नगर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने सिना नदी वाहू लागल्याने सिना धरणात झपाट्याने पाण्याची आवक झाली. त्यामुळे सिना
धरणात आज अखेर ८० टक्के इतका पाणीसाठा आहे. सिना
धरणातीला पाण्यावर निमगाव गांगर्डा, मिरजगावसह १७ गावांची
पाणी योजना अवलंबून आहे. त्यात मिरजगाव व श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या मोठ्या
गावाच्या पाणी योजनेचा पण समावेश होतो. सिनातून आष्टी
तालुक्यातील मेहकरी हा ओव्हरफ्लोचा पाणी प्रकल्प
असल्याने मेहेकरी प्रकल्प लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
सीना धरणावर उजवा व डावा कालवा असल्याने कालव्या खालील शेतीचा खरीप व रब्बी
हंगामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
स्पेशिफिकेशन-
*सिना
धरण पाणी क्षमता व सिंचन क्षेत्र धरण क्षमता- २४००.
*एकून साठा:१८९९.७२(द.ल.घ.फु.)
*एकूण
साठा टक्केवारी: ७९.१०%
*उपसा
सिंचन - १२०० हेक्टर.
*लाभ
क्षेत्रातील तालुके- कर्जत,
श्रीगोंदा व आष्टी तालुका.
0 टिप्पण्या