Ticker

6/Breaking/ticker-posts

आमच्यावर झालेले आरोप खोटे; माझी व सहकार्‍यांची अग्निपरीक्षा - किरण काळे



 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

.नगर : मी व माझ्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सहकार्याने काल आयटीपार्क ची पाहणी करत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग, सदर महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी असे कृत्य केलेले नाही. आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवले जात आहे. सदर कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. सदर प्रवेश हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हरकत नसल्यामुळेच झालेला आहे. जर तशी त्यांना हरकत असती तर त्यांनी तशा पद्धतीने आम्हाला सुचना केल्या असत्या आणि आम्ही त्या सूचनांचे पालन केले असते. मात्र त्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला आणि कोणत्याही प्रकारची बाचाबाची अथवा ज्या पद्धतीने फिर्यादी मध्ये उल्लेख केला आहे तशी घटना घडलेली नाही.असा दावा  काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष  किरण काळे यांनी केला आहे ॰

 

आम्ही सदर आयटी पार्कची पाहणी करत असताना कोणत्याही महिला अथवा पुरुष शौचालयांमध्ये प्रवेश केलेला नाही. काल किरण काळे आणि काँग्रेस  टीमने आयटी पार्कच्या केलेल्या पाहणीचे सर्व व्हिडिओ फुतेज पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांना दाखवले. ज्या कंपन्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर सदर विनयभंगाचा प्रकार घडल्याची तक्रार फिर्यादीने दिले आहे तेथील फुटेज देखील माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवले. सदर कुठेच पाहिले असता त्या फूटेजमध्ये किरण काळे व त्यांचे सर्व सहकारी कोणत्याही महिलेशी चुकीचं वर्तन करताना दिसून आलेले नाहीत. उलट सदर महिलांशी चांगला संवाद झाला असून किरण काळे यांनी उपस्थित महिलांना व तिथल्या युवकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे ऐकायला आणि पाहायला त्या व्हिडिओमध्ये मिळाले आहे. यामुळे फिर्यादीने केलेली तक्रार ही राजकीय दबावातून असून ती खोटी आहे अशा प्रकारची भूमिका किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.

 

आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांना देखील हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार असून त्यांच्याकडे कंपनीने दिलेले फुटेज आणि आमचे फुटेज त्याची पडताळणी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल आणि नगरकरा समोर सत्य काय आहे ते येईल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ! आमचा कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. 

आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला सामोरे जाण्यापूर्वी मी या शहराचे माजी आमदार दिवंगत अनिल भैया राठोड यांच्या शिवालय कार्यालय या ठिकाणी माझ्या सहकार्यां सह जाऊन त्यांच्या प्रतिमेस वंदन करून आलो आहे. स्व.अनिल भैय्या यांनी या शहरामध्ये सतत अन्याय विरुद्ध वाचा फोडत या शहरातील सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका सातत्याने घेतली होती आणि त्यांच्या याच मार्गावर मी आणि माझी काँग्रेस सातत्याने काम करत आहे. त्यामुळे आज अनिल भैय्या यांची आठवण होत आहे. मात्र आज जरी ते हयात नसले तरी देखील या शहराला विकासाचा चेहरामोहरा देत असताना सर्वसामान्यांना संरक्षण देणे हा देखील आमच्या भूमिकेचा मुख्य भाग आहे. असे काळे यांनी म्हटले आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या