लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
संगमनेर: राज्यात गुटखा बंदी असली तरी संगमनेरमध्ये
मुबलक गुट्खा येतोय.एका वाहनातून येणारा १ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा आणि ३ लाख
रुपये किंमतीची ओमीनी कार असा एकूण ४लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी
जप्त करुन दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील
दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी
सदर वाहन घुलेवाडी शिवारात पकडले.गुटखा, तंबाखू व तीन लाख रुपये किंमतीची
ओमीनी कार असा एकूण 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस नाईक सचिन उगले यांनी शहर पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जमिल शेख व खलील शेख यांच्याविरुद्ध सह
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006
चे कलम 59(2) प्रमाणे दाखल केला
आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहे. सदर आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर
हजर केले असता त्यांना न्यायालयाने 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
0 टिप्पण्या