Ticker

6/Breaking/ticker-posts

सीए परीक्षेचा निकाल जाहीर ; कोणकोणत्या वेबसाइट्सवर पाहता येणार निकाल जाणून घ्या...

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : CA Final Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (Institute of Chartered Accountants of India)सोमवारी १३ सप्टेंबर २०२१ रोजी सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते आपला स्कोअर icai.org वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ICAI  CA Result 2021: कसा पाहाल?
*आयसीएआयचे अधिकृत संकेतस्थळ caresults.icai.org वर जा.
*होमपेजवर CA Final (Old) July 2021 किंवा CA Final (New) July 2021 किंवा CA Foundation July 2021 लिंकवर क्लिक करा.
*आता एक नवी विंडो उघडेल.
*तुमचा रोल नंबर, पिन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आदि माहिती भरून लॉगइन करा.
*कॅप्चा भरा आणि सबमिट करा.

* आता तुमचा सीए निकाल स्क्रीनवर दिसेल.
* तो डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घेऊन ठेवा.

सीएची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली. सीए अंतिम (जुनी स्कीम) गट १ ची परीक्षा ५, , ९ आणि ११ जुलै रोजी आणि सीए अंतिम (जुनी स्कीम) गट २ ची परीक्षा १३, १५, १७ आणि १९ जुलै रोजी घेण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या