*निवडणूक कार्यक्रमात गंभीर चुका.
*सोशल मीडियातून टीका होताच प्रशासनाने सुधारली चूक.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक
आणि वाद हे समीकरण संपायला तयार नाही. बँकेची वार्षिक सभा शिक्षक आपसांतील वादाने
गाजवितात. आता याच बँकेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून झालेल्या
चुकीमुळे गाजणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना वेळेच्या संदर्भात चुका झाल्या आहेत. उमेदवारी
अर्ज ‘सकाळी चार’ वाजता स्वीकारणार तर
निकाल ‘दुपारी ७’ वाजता जाहीर करणार
असे यात उल्लेख झाले आहेत. हा निवडणूक कार्यक्रमात प्रसिद्ध झाल्यानंतर ही चूक लक्षात आणून दिली जात असून ही प्रिंटींग
मिस्टेक असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे यासाठीचे अध्यासी अधिकारी आहेत. त्यांच्यावतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एका बाजूला निवडणुकीची चर्चा तर दुसरीकडे या निवडणूक कार्यक्रमात झालेले घोळ याची सध्या शिक्षकांच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, बँकेच्या सभा तसेच आरोप- प्रत्यारोपामुळे गुरुजींची ही बँक जिल्ह्यात कायम चर्चेत असते. आता निवडणूक कार्यक्रमाचे पार १२ वाजून टाकल्याने पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियातून टीका होऊ लागल्याने बँकेच्या
प्रशासनाने आता चुकीची दुरूस्ती करून सुधारित आदेश प्रसिद्ध केला आहे.
0 टिप्पण्या