लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत: राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यानी सध्या शिवसंवाद
दौर्यातूय बेरजेचे राजकारण सुरु केले असून कर्जत तालुक्यामध्ये शिवसेनेने
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला खिंडार
पाडले आहे. युवकांनी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत युवकांनी
शिवसेनेत मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश करत शिवबंधन बांधले.
कर्जत तालुक्यामध्ये शिवसेनेने एकाच
वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला धक्का देत युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश घडवून
आणला आहे. तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या पुढाकाराने मधून या दोन्ही पक्षातील
युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवबंधन बांधले.
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री
शंकरराव गडाख हे कर्जत तालुक्यातील शिंदे येथे शिव संवाद घोंगडी बैठक यासाठी आले होते.
यावेळी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक आणि कुळधरण येथील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या युवकांनी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत सिद्धटेक येथील सुरज परदेशी तर
कुळधरण येथील भाऊ गुंड सचिन सुपेकर समाधान जगताप अक्षय सुपेकर किरण सुपेकर अक्षय
भवाळ सुरज गजरमल सागर
शिंदे रवी काळे महादेव गजरमल यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर
जिल्ह्याचे प्रमुख रावसाहेब खेवरे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी तालुकाप्रमुख
बळीराम अण्णा यादव माजी तालुकाप्रमुख बिबीशन गायकवाड कर्जत शहर प्रमुख अक्षय
तोरडमल उपतालुका प्रमुख सुभाष जाधव ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत घालमे विभाग
प्रमुख पोपट धनवडे अक्षय घालमे पौरूष जाधव यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे अनेक
मान्यवर त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य
यावेळी उपस्थित होते.
निवडणुकीत शिवसेनेची ताकद
दाखवणार
यावेळी बोलताना मंत्री शंकराव गडाख
म्हणाले की कोरोनामुळे मोठे कार्यक्रम घेता येत नसले तरीदेखील शिव संवाद घोंगडी
बैठक यादेखील प्रभावी होत आहेत आज अनेक राष्ट्रवादी व भाजपमधील कार्यकर्त्यांनी
शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे मी स्वागत करतो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व
निवडणुकीत शिवसेना आपली सर्व ताकद पणाला लावून त्या जिंकण्यासाठी प्रयत्न करणार
आहे.
यावेळी बोलताना नगर दक्षिण
जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे
त्यांच्या मार्फत मी शेतकरी सर्वसामान्य जनता नागरिक यासाठी विविध योजना राबवल्या
जात आहेत तसेच शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीने
राज्यात प्रथमच शिव संवाद घोंगडी बैठकांचे आयोजन शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख
यांनी केले आहे आणि त्याला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रास्ताविक माजी
तालुका अध्यक्ष बिभीषण गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन पोपट धनवडे व पौरूष जाधव यांनी केले.
0 टिप्पण्या