Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीमती अनिता सोनवणे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


पाथर्डी  : श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर पाथर्डी येथील विद्यार्थीप्रिय  शिक्षिका श्रीमती अनिता सोनवणे यांना ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या  वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लहु कानडे,आ.डॉ.सुधीर तांबे,कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर,श्रीमती साईलता सामलिटी उपस्थित होते,या मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमती सोनवणे या वीस वर्षापासून श्री. स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर या शाळेत अध्यापनाचे कार्य करत आहेत. शालेय उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. जिल्हा परिषदेच्या वतीने घेतल्या  जाणाऱ्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी  यश संपादन केलेले आहे. तसेच क्षितिजा प्रकाशन  राहुरी संचलित सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा, डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान अहमदनगर प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा व राज्य स्तरावर RTSE Exam या विविध परीक्षेत त्यांच्या वर्गातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत. शाळेच्या वतीने राबवले जाणारे विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी साहित्य संमेलन, आषाढी एकादशीनिमित्त शहरात बाल दिंडीचे आयोजन, ऐतिहासिक ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी आनंद बाजारचे आयोजन या विविध  उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. करोना काळात शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळेच्या वतीने ऑनलाइन तासिका घेण्याचे नियोजन करून शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी अखंडपणे अध्यापनाचे कार्य केले, तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून खिळवून ठेवण्यासाठी आनंददायी अध्यापन याबरोबरच विविध स्पर्धा, थोर व्यक्तींची  भाषणे ऑनलाइन घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अखंडपणे अध्यापनाचे कार्य केले. तसेच सहसंवेदना महिला सक्षमीकरण ग्रुप मार्फत गेल्या दीड वर्षांपासून गरजू,होतकरू महिला व विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात श्रीमती सोनवणे यांचा उत्साहपूर्वक सहभाग असतो .या सर्व कार्याची दखल घेऊन ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेने पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष दिलीप भांडकर व सर्व कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापक एकनाथ ढोले,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या