लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
साकत :परिसरातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे व तक्रार केली आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी नंदकुमार भोंडवे यांनी नुकतेच जामखेड तालुक्यातील साकत येथे पंचनामे केले .
ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावयाचे आहेत त्या शेतकऱ्यांना सकाळीच फोन करून सांगितले त्यामुळे सर्व शेतकरी हजर होते तसेच त्यांना काय कागदपत्र लागतात याचीही कल्पना सकाळीच दिल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली नही सुगीचे दिवस असत्याने आमचा वेळ वाचला व धावपळ झाली नाही , त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधीचे आभार मानले.
यावेळी बोलताना नंदकुमार भोंडवे म्हणाले दिघोळ माळेवाडी खर्डा साकत सह डोंगर परिसरातील ज्यांचे नुकसान झाले आहे व पिक विमा भरला आहे तक्रार केली आहे आशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले जात आहे.यावेळी त्यांच्या सोबत प्रविण वराट ,यश वराट ,महादेव मुरूमकर , चत्रभुज मुरूम कर, बाळासाहेब वराट आदि शेतकरी होते .
तालुक्यातील सर्वात उंचीवर गर्भगिरी बालाघाट डोंगराच्या रांगावर मराठवाड्याचे प्रवेश द्वार साकत गावाला तालुक्यात चेरापुंजी असे समजले जाते. दरवर्षी साकला जास्त पाऊस होतो मात्र या वर्षी पावसाने कहरच केला आहे. सोयाबीन चे कोठार म्हणून साकत गावची ओळख आहे परिसरात अतिष्टीने सोयाबीन उडीद मूग पिकांची मोठ्या प्रमानात नुकसान झाली आहे .
0 टिप्पण्या