Ticker

6/Breaking/ticker-posts

चहाच्या टपरीवरुन जनतेशी सवांद ; जिल्हाभरात मंत्री गडाख यांच्या साधेपणाची झलक..!

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नेवासा : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यानी मंत्री झाले तरी आपला साधेपणाणा जपला आहे. त्याचा अनुभव तालुक्यातील जनतेने अनेकदा घेतला आहे. जिल्हाभरातील शिवसंवाद दौर्यातही त्यांच्या साधेपणाची झलक अनुभवायास मिळत आहे. मंत्रिपदाचा मोठेपणा करू नका, जनतेचे कामे करत रहा, असा सल्ला कार्यकर्त्याना देतानाच मला नामदार म्हणू नका आमदारच म्हणा असे त्यांनी  जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आहवान केले आहे. औरंगाबाद रस्त्यावर  देवगड येथे एका चहाच्या टपरीवर मंत्री गडाख यांनी आपली बैठक मांडत जनतेचे प्रश्न सोडविले. 

 एखादा ग्रामपंचायत सदस्य जरी झाला तरी त्याच्या डोक्यात भलती हवा जाते. त्याचं वागणं बदलतं,  राहणीमान बदलतंपण राजकारणात राहूनही अशी  काही माणसं असतात, ज्यांचे पाय जमिनीवर असतात, त्यांच्या वागण्या-बोलण्यात काही फरक पडत नाही. त्यातलंच एक नाव म्हणजे राज्य  मंडळातील कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख.

 यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. नगर-औरंगाबाद  महामार्गावरून जात असताना देवगड फाटा येथील नागरिकांनी हात केला असता लगेच गाडी बाजुला थांबवून चहाच्या टपरीवर चहा घेतला व परिसरातील शेतकरी व नागरीकांसी संवाद साधला. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, साहेब तुम्ही आमदार झाल्यापासून उन्हळ्यातही  पाटाचे पाणी वेळेत मिळाले विहिरी बोर फुल झाले मोठया प्रमाणात पिके घेता आली व टेलचा भागातील शेतकरी सुखी झाला.  यावेळी गडाख म्हणाले की, मी सर्वात जास्त आंदोलने शेतकऱ्यांसाठी केली आहेत व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत राहणार आहे. 

 लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या , रोडवरच्या एका चहाच्या टपरीवर त्यांनी चहाचा अस्वाद घेतला. तसंच उपस्थित  लोकांना देखील त्यांनी चहा घेण्याचा आग्रह केला. यावेळी आपण  मंत्री आहोत, हे ते विसरुन गेले होते. ठाकरे सरकारमध्ये निवड झाल्यापासून गडाख  यानी आपला साधेपणा जपला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या