Ticker

6/Breaking/ticker-posts

स्पर्धेच्या युगात भिंगार अर्बन बँकेने नेत्रदिपक प्रगती केली - चेअरमन झोडगे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 नगर :  भिंगार बँकेला 112 वर्षांहून अधिक अशी परंपरा आहे, यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे.  सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा विश्वास आणि संचालक मंडळाचे सहकार्य यामुळे आज बँक प्रगतीपथावर आहे.  यात स्व.गोपाळराव झोडगे यांनी बँकेची धुरा अनेक वर्ष सांभाळून बँकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. बँकेने काळानुरुप बदलून अत्याधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्याने बँकेच्या सेवेत भर पडत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्वास वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, बँकिक क्षेत्रातील प्रचंड स्पर्धा सातत्याने घडणारे बदल आणि सभासद खातेदारांच्या वाढत्या अपेक्षा या पार्श्वभुमीवर बँकेने अहवाल वर्षात भरीव नेत्रदिपक प्रगती साध्य केली आहे. बँकेने वर्ग कायम राखला असून, बँकेच्या या वर्षीच्या नफ्यातही वाढ झाली आहे. सभासदांना १२टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती भिंगार अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी दिली.

 

भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत चेअरमन अनिलराव झोडगे यांनी ही माहिती दिली.  याप्रसंगी  व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, संचालक रमेश परभाने, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, संदेश झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, कांताबाई फुलसौंदर, तिलोत्तमा करांडे, तज्ञ संचालक आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन, मच्छिंद्र पानमळकर आदि उपस्थित होते.

 

यावेळी तज्ञ संचालक आर.डी.मंत्री म्हणालेबँकींग क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आधुनिक सेवा देणार्‍या बँकांना ग्राहकांची पसंत राहत असते. त्यादृष्टीने भिंगार बँकेनेही अत्याधुनिक सुविधा स्वीकारुन सेवा देत आहे. त्यामुळे बँकेच्या प्रगतीत भर पडत आहे. बँकेने थकित कर्जदारांसाठी वन टाईम सेंटलमेंटयोजना राबवून ग्राहकांबरोबरच बँकेचा फायदा केला आहे. सर्वांच्या सहकार्याने बँकेने आपल्या कामात सातत्य ठेवून लौकिक कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथाजी राऊत यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांनी मानले.   यावेळी सभासदांच्या प्रश्नांना संचालकांनी समर्पक उत्तरे दिली. विषय पत्रिकेवरील सर्वविषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रारंभी बँकेचे अनेक वर्षे चेअरमन राहिलेले स्व.गोपाळराव झोडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहकार विभागाच्यावतीने संचालक व सभासदांसाठीचे प्रशिक्षणही पार पाडले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या