लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली वनडे आणि टी-२० चे कर्णधारपद सोडणार असल्याचे वृत्त समोर आले
आहे. विराट फक्त कसोटी संघाचे नेतृत्व करेल तर वनडे आणि टी-२० संघाचे नेतृत्व दिले
जाईल. विराटला आतापर्यंत वनडे किंवा टी-२० मध्ये आयसीसीचे विजेतपद मिळवता आले नाही.
सोमवारी आलेल्या या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली
आहे. प्रसार माध्यमांपासून ते सोशल मीडियावर फक्त विराट आणि रोहित शर्मा यांच्या बद्दल चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचे खरच दोन कर्णधार
होणार का याबद्दल बीसीसीआयचे काय मत आहे हे विचारण्यात आले तेव्हा बोर्डाचे
कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
क्रिकेट संघाच्या नेतृत्वात बदल होईल
यासंदर्भातील वृत्त चुकीचे आहे. असे काहीही होणार नाही. ही बातमी प्रसार
माध्यमांनी तयार केली आहे. बीसीसीआयने यासंदर्भात कोणताही विचार केला नाही, ना कोणाशी चर्चा केली आहे. विराट कोहली
आता जसा तिनही संघाचा कर्णधार आहे तसाच राहिल.
आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर वनडे आणि टी-२० संघाचे
नेतृत्व रोहित शर्माकडे दिले जाणार असल्याचे वृत्त आले होते. कसोटीत विराटच
कर्णधार असेल. त्याने कसोटीत फार चांगली कामगिरी केल्याचे बोर्डाचे मत आहे.
धुमल यांनी हे देखील स्पष्ट केले की यासंदर्भात
कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच संघासंदर्भात कोणत्याही प्रकारची नारजी नाही.
२०१४ साली महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद
सोडल्यानंतर विराटकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या
आयसीसीच्या ३ मोठ्या स्पर्धेत विराटला अपयश आले. २०१७च्या चॅम्पियन ट्रॉफीत
फायनलमध्ये पाकिस्तानकडून, २०१९च्या
वनडे वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून, २०२१च्या
टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता.
0 टिप्पण्या