Ticker

6/Breaking/ticker-posts

एन एच 61 च्या रखडलेल्या कामासाठी ऋषिकेश ढाकणे यांचे मंत्री गडकरींना साकडे










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).

टाकळीमानुर :सन 2016 पासून कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या व रखडलेल्या कामाची तातडीने पूर्तता करण्यासाठी साठी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले नागपूर येथे मंत्री गडकरी यांची भेट घेत ढाकणे यांनी या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले

नागपूर येथे मंत्री नितीन गडकरी यांची भेट ऋषिकेश ढाकणे यांनी घेऊन येण्याचे कष्ट या महामार्गाच्या दुरुस्तीबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली दिलेल्या निवेदनात ढाकणे यांनी म्हटले की सुमारे 130 कोटी रुपये खर्चून या मार्गाचे काम सुरू आहे मात्र सन 2016 पासून पूर्णत्वाकडे गेलेले नाही काम सुरू असताना एकाच वेळी खोदून ठेवण्यात आले आहे सन 2016 पासून हे काम रखडले असून पाच वर्षांपूर्वी मेहेकरी ते पाडळशिंगी दरम्यानचा रस्ता व पुल एकाच वेळी खोदून ठेवण्यात आली आहे नगर ते मेहेकरी व भुतेटाकळी ते पाडळशिंगी इथला रस्ता झाला.

 मात्र मेहेकरी ते पिंपळगव्हाण परिसरातील रस्त्याच्या कामाला ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्रहण लागले आहे रस्ता अर्धवट पुलामुळे आत्तापर्यंत सुमारे 350 प्रवाशांचा मृत्यू विविध अपघात झाला आहे राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष आहे पाथर्डी सारख्या दुष्काळी डोंगर पट्ट्यातील भाग मुख्य प्रवासी जोडून दळणवळणाच्या माध्यमातून परिसराचा मोठा विकास होण्याची संधी असून केवळ ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील अनेक उद्योग व व्यावसायिक स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीत दिसताहेत मेहेकरी ते भुतेटाकळी सुमारे 52 किलोमीटर रस्त्याचे काम रखडले.

  दिल्लीत जाताच प्रश्न निकाली काढू गडकरी

  मंत्री गडकरींनी ढाकणे यांचे निवेदन वाचून त्यांच्या कडून सर्व माहिती जाणून घेतली व दिल्लीला जाताच पाथर्डी तालुक्याची या प्रश्नातून सुटका करू व या महामार्गाचे रखडलेल्या का मागचे नेमके काय कारण आहे हे जाणून घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे

साहेबांना माझा नमस्कार सांग 

मंत्री गडकरी यांचे ढाकणे परिवाराची निकट स्नेहसंबंध बबनराव ढाकणे यांचा तब्येतीची आस्थेने चौकशी विचारपूस करत मला त्यांना एकदा भेटायचे असल्याचे सांगितले. एडवोकेट प्रतापराव ढाकणे यांची चौकशी करत केदारेश्वरची धुरा  सांभाळा,असंच काम करत राहा असा वडीलकीचा सल्ला मंत्री नितिन गडकरी यांनी ऋषिकेश ढाकणे यांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या