लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: महाराष्ट्र
पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल
करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही
अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह बदली दिली गेली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे
CID प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची
बदली करण्यात आली आहे तर, सीआयडीचे प्रमुख असलेले अतुलचंद्र
कुलकर्णी यांची राज्य कारागृहाचे (सुधारसेवा) प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली
आहे.
राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे
आदेश सोमवारी रात्री काढले. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस
उपमहानिरीक्षक अशा पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अशा आहेत
प्रमुख बदल्या...
*अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी
(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई) संजय के. वर्मा यांची राज्याच्या अपर पोलीस
महासंचालक (नियोजन व समन्वय) या पदावर बदली करण्यात आली आहे.
*राज्याचे
सध्याचे अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) एस. जगन्नाथन यांची अपर पोलीस
महासंचालक व संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी,
मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
*संजीव सिंघल यांची राज्याच्या अपर पोलीस
महासंचालक (आस्थापना) या पदावर बदली करण्यात आली आहे तर अर्चना त्यागी यांची अपर
पोलीस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ या पदावर बदली
करण्यात आली आहे.
*प्रशांत एस बुर्डे यांची अपर पोलीस
महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई
येथे बदली करण्यात आली आहे तर अनुप कुमार बलबीर सिंह यांची राज्य अपर पोलीस
महासंचालक (प्रशासन) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
* सुनील रामानंद यांची राज्य अपर पोलीस
महासंचालक, संचालक, दळणवळण व परिवहन, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
प्रवीण
राजाराम साळुंके, अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)
महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने), मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुबई (पदोन्नतीने), ब्रिजेश सिंह, अपर पोलीस महासंचालक व उप महासमादेशक, गृह रक्षक दल,
महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने),
चिरंजीव प्रसाद, अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बदल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने), डॉ. रविंद्रकुमार सिंघल,
नियंत्रक, वैद्यमापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सध्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक
श्रेणीतील पद अपर पोलीस महासंचालक श्रेणीमध्ये उन्नत करून पदोन्नतीने बदली)
पुण्यात कोण
कुठे?
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त
आयुक्त अशोक मोराळे यांची ठाणे येथे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली
झाली आहे. तर, दक्षिण
विभागचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त
आयुक्त आर. बी. डहाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथील उपायुक्त
सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने गुन्हे अन्वेषण विभागात उपमहानिरीक्षक म्हणून बदली
करण्यात आली आहे. तसेच, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त
रामनाथ पोकळे यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
0 टिप्पण्या