लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः स्वातंत्र्य दिनाला लाल
किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी केले ध्वजारोहण. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य
दिनाला पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित केले... वाचा अपडेट्स....
*पंतप्रधान
मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषण संपले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय
खेळाडूंना आणि लाल किल्ल्यावरी कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पीए
मोदींनी अभिवादन केलं
“यही समय है, सही समय है,भारत का अनमोल समय है । असंख्य भुजाओं की
शक्ति है,हर तरफ़ देश की भक्ति है, तुम
उठो तिरंगा लहरा दो,भारत के भाग्य को फहरा दो। यही समय है,
सही समय है, भारत का अनमोल समय है। कुछ ऐसा
नहीं जो कर ना सको, कुछ ऐसा नहीं जो पा ना सको, तुम उठ जाओ, तुम जुट जाओ, सामर्थ्य
को अपने पहचानो, कर्तव्य को अपने सब जानो, भारत का ये अनमोल समय है, यही समय है, सही समय है ।’’ पीएम मोदींनी वाचली कविता
कर्मावर
विश्वास ठेवतो, भविष्यद्रष्टा नाहीः पीएम मोदी
*सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करून देशाने आपल्या शत्रूंना हा नवीन भारत
आहे, हे दाखवून दिले आहे. साम्राज्यवादाचा कुटील इरादे
ठेवण्याऱ्यांनाही भारताने इशारा दिला आहे. भारत कठोर निर्णय घेऊ शकतो, हा संदेश यातून शत्रूंना दिला गेला आहेः पीएम मोदी
*पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करतो. भारत हा ग्रीन हायड्रोजनचे हब
बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेतः पीएम मोदी पर्यावरण संरक्षणासाठी देशातील
रेल्वे वाहतूक १०० टक्के विजेवर चालवण्यासाठी काम सुरू आहे. २०३० पर्यंत हे लक्ष्य
पूर्ण केले जाईलः पीएम मोदी
*भारत अजूनही ऊर्जा क्षेत्राबाबत परावलंबी आहे.
यामुळे देशाला स्वावलंबी व्हावं लागले. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण
होण्यापूर्वी देशाला ऊर्जा स्वावलंबी बनवण्याचा संकल्प करूया. यासाठी सरकारने
योजना तयार केली आहेः पीएम मोदी
*देशातील सैनिका शाळांमध्ये मुलींनाही शिक्षण दिले
जाईलः पीएम मोदी
*गरीबाची मुलगी,
मुलगा मातृभाषेत शिकून प्रोफेशनल्स होतील. यामुळे त्यांच्या
सामर्थ्याला न्याय मिळेल. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गरीबी विरोधातील लढाईतील
साधन आहेः पीएम मोदी
*सुधारणा लागू करण्यासाठी चांगेल आणि स्मार्ट
गव्हर्नन्स पाहिजे. भारत गव्हर्नन्सचा नवा अध्याय लिहित आहे, याचे साक्षीदार आज संपूर्ण जग आहेः पीएम
मोदी
*आगामी
काळात पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय योजनेनुसार १०० लाख कोटींहून अधिक योजनांच्या
माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ही अशी योजना आहे, ज्यामुळे समग्र पायाभूत सुविधेचा पाया रचेल.
आता वाहतुकीच्या साधनांमध्ये ताळमेळ नाही. हा अडथळा यामुळे दूर होईलः पीएम मोदी
*भारत
आगामी काळात प्रधानमंत्री गतीशक्ती- नॅशनल मास्टर प्लॅन लाँच करणार आहेः पीएम मोदी
*स्वदेशी वस्तूंच्या उत्पादन भारत मागे
नाही. देश सध्या ३ बिलियन डॉलर्सचे मोबाइल निर्यात करत आहेः पीएम मोदी
*स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतची
समुद्रात चाचणी सुरू आहे. आज भारत आपले लढावू विमान विकसित करत आहे. पाणबुडी बनवत
आहे एवढचं नव्हे तर गगनयान मोहीमही राबत आहेः पीएम मोदी
*७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५
नव्या वंदे भारत ट्रेन्स देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतीलः पीएम मोदींची घोषणा
*जहां तक हो सके अतीत की ओर देखो। पीछे जो
चिर नूतन झरना बह रहा है, आकंठ
उसका जल पीयो। उसके बाद सामने की ओर देखो। आगे बढ़ो और भारत को पहले से ज्यादा
उज्ज्वल, महान, श्रेष्ठ बनाओ, पीएम मोदींनी केला स्वामी विवेकानंदाच्या विचारांचा उल्लेख.
*गावांमधील बचत गटांमध्ये ८ कोटींहून अधिक
महिला आहेत. त्या एकत्र येऊन उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांच्या
उत्पादनांना देश आणि विदेशात बाजार उपलब्ध होईल यासाठी सरकार ई-कॉमर्स प्लॅफॉर्म
तयार करणा आहेः पीएम मोदी
*छोटा किसान देश की शान बनेल... आपले
स्वप्न आहे. आगामी काळात छोट्या शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना
सुविधा दिल्या जातीलः पीएम मोदी
*पीएम किसान योजनेनुसार जवळपास १० कोटी
शेतकऱ्यांना दीड लाख कोटींची आर्थिक मदत दिली गेली आहेः पीम मोदी
*छोट्या शेतकऱ्यांवर आतापर्यंत लक्ष दिले
गेले. आता या शेतकऱ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड, सौर ऊर्जा पंप, शेतकरी
उत्पादक संघटनांद्वारे शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. आता वेअर हाऊस चळवळ राबवली
जाईलः पीएम
*देशातील ८० टक्के शेतकऱ्यांकडे २
हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन. ही चिंतेची बाब आहेः पीएम मोदी
*सहकारी चळवळ ही देशाच्या विकासासाठी मोठे
क्षेत्र आहे. सहकार हे एक संस्कार आहे आणि एकत्रित चालण्याची मनोवृत्ती आहे.
यामुळे सरकारने सहकार क्षेत्रासाठी वेगळे मंत्रालय बनवले आहे. राज्यांतील सहकारला
आणखी बळकटी देण्यासाठी हे सहकार मंत्रालय स्थापन केले आहेः पीएम मोदी
*२१ व्या शतकात भारत ब्ल्यू इकॉनॉमिकच्या
प्रयत्नांना वेग देत आहेः पंतप्रधान मोदी
*जम्मू-काश्मीरमध्येही
विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण
केल्या जात आहे. सिंधु सेंट्रल युनिव्हर्सिटीमुळे लडाख उच्च शिक्षणाचे केंद्र
बनणार आहेः पीएम मोदी
*लवकरच ईशान्येतील सर्व राज्यांच्या
राजधानी रेल्वे मार्गाद्वारे जोडल्या जाती. ईशान्य भारताच्या विकासाठी पर्यटन, अॅडव्हेंचर स्पोर्ट्सला चालना दिली
जाईलः पीएम मोदी
*देशातील ओबीसी समाजांना आरक्षणाचा अधिकार
मिळणार आहे. मागास समाजांना आरक्षणाचा अधिकार देण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती
विधेयक मंजूर झालेः पीएम मोदी
*गरीब महिला आणि मुलांमध्ये
कुपोषणाने त्यांच्या विकासात मोठा अडथळा येतो. यामुळे गरीबांना पोषणयुक्त तांदळाचे
वाटप केले जाईलः पीएम मोदी
*सरकारच्या सर्व योजना प्रत्येक
नागरिकापर्यंत पोहोचवायच्या आहेत. उज्ज्वला,
आवास आणि आयुषमान भारत, या योजना
प्रत्येकापर्यंत पोहोचतील यासाठी काम करायचं आहेः पीएम मोदी
*सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका
विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेतः पीएम
मोदी
*हा
फक्त ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याचा समारंभ नाही तर आता परिश्रमांची पराकाष्टा
करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहेः पीएम मोदी
*आपल्याला असा आधुनिक भारत बनवायचा आहे
जिथे सर्व नागरिकांना अत्याधुनिक सुविधा असतीलः पीएम मोदी
*आपल्याला पुढील २५ वर्षांत
समृद्धीचे नवीन शिखर गाठायचे आहे. अशा विकासाचे निर्माण करायचे आहे, जिथे शहर आणि
ग्रामीण असा भेद राहणार नाहीः पीएम मोदी
*देशाच्या विकासासाठी ७५ वर्षांच्या
स्वातंत्र्याच्या निमित्ताने आपल्या नवीन संकल्प सोडावे लागतील. कोणत्याही
क्षेत्रात भारत मागे राहू नये, यासाठी संकल्प करूयाः पीएम मोदी
*करोनाच्या संकटात अनेक मुलं अनाथ झाली.
त्यांनी आपल्या पालकांना गमवलं. हे अतिशय वेदनादायी आहेः पीएम मोदी
*पोलिओची लस मिळवण्यासाठी देशाला अनेक
वर्षे लागली. पण करोना लसीसाठी आपल्याला कुणावर अवलंबून राहण्याची वेळ आली नाहीः
पीएम
*करोनाचे संकटाचा भारतीयांनी संयमाने आणि
धैर्याने सामना केला आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी भारताला लस विकसित करून दिली. आज
आपल्याला लसीसाठी कुणावर अवलंबून रहावं लागलं नाहीः पीएम मोदी
*ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आणि पदक
विजेत्या खेळाडूंचा टाळ्या वाजवून पंतप्रधान मोदींनी केला गौरव
*नैसर्गिक
आपत्तीमुळे आणि पूर आणि पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
संपूर्ण देश या बिकट स्थितीत या राज्यांसोबत आहेः पीएम मोदी
*करोनाच्या महामारीत वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस
विकसित करणारे शास्त्रज्ञ आणि देशातील जनतेने संकटाचा सामना केला. करोनाच्या
संकटात अहोरात्र झटणाऱ्या योद्ध्यांचे विशेष आभारः पीएम मोदी
*स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या दिनानिमित्त देश
स्वातंत्र्यवीरांना आणि क्रांतिकारकांचे स्मरण करत आहे. १४ ऑगस्ट हा फाळणी स्मृती
दिन असेलः PM मोदी
0 टिप्पण्या