लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबान वरचढ ठरतअसून अफगाण सैन्याची पिछेहाट होत आहे. तालिबानने महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे तालिबानने अफगाण हवाई दलाचे हेलिकॉप्टर ताब्यात घेतले आहे. रशियन बनावटीचे हे हेलिकॉप्टर भारताने अफगाणिस्तानला भेट म्हणून दिले होते. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. तालिबानने कुंदूज विमानतळाचा ताबा घेतला आहे.
तालिबानने
ताब्यात घेतलेले हेलिकॉप्टर हे नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली. अफगाण हवाई
दलाच्या जवानांनी तळावरून हेलिकॉप्टर सोडून जाताना त्यातील महत्त्वाची उपकरणे
काढली आहेत. त्यामुळे हे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकत नाही.
या लढाऊ
हेलिकॉप्टरमध्ये आठ जणांच्या बसण्याची व्यवस्था आहे. काही देशांमधील युद्धात या
हेलिकॉप्टरने सहभाग घेतला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये २३ एमएमची डबल बॅरल GSh-23V कॅनन आहे. एका मिनिटात ३४०० ते ३६००
राउंड फायरिंग करता येणे शक्य आहे. त्याशिवाय या हेलिकॉप्टरमध्ये अॅण्टी टँक
मिसाइल, रॉकेट, गन आणि अतिरिक्त इंधन
टाकी लावता येऊ शकते.
0 टिप्पण्या