Ticker

6/Breaking/ticker-posts

डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांना मुदतवाढ

 

*पॉलिटेक्निकच्या अर्जांसाठी मुदतवाढ

*२७ ऑगस्टपर्यंत वाढवला कालावधी

*तात्पुरती गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नागपूर: दहावीच्यानंतरच्या तीन वर्षांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे अर्ज करण्याची मुदत २७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनलयाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे.

डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. ३० जून रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार होते. त्यात वाढ करून आता २७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे, त्यांची छाननी करणे, ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे ही कामे २७ तारखेपर्यंत करता येतील.

नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या याद्यांमध्ये तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. केंद्रीय प्रवेशप्रकियेच्या विविध फेर्‍यांमध्ये ऑप्शन फॉर्म भरणे, जागावाटप, जागास्वीकृती करणे, मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने उपस्थित होणे, प्रवेशाची अंतिम तारीख याबाबतचे वेळापत्रक https://poly21.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे, तंत्रशिक्षण संचालनालयाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या