Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर शहरातील लॉकडाऊन शिथिल करावे ; शिवसेनेची मनपा आयुक्तांकडे मागणी






 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अ.नगर :कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अंशतलॉकडाऊन लावण्यात आले आहेया काळात नगर शहरात गेल्या महिन्यभरापासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने नियम शिथील करुन  हे लॉकडाऊनची वेळ रात्री 8 पर्यंत करावीअशी मागणी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगेयुवा जिल्हाध्यक्ष विक्रम राठोडनगरसेवक बाळासाहेब बोराटेमाजी महापौर अभिषेक कळमकरसंजय शेंडगेनगरसेवक गणेश कवडेसचिन शिंदेदत्ता जाधवपरेश लोखंडे आदि उपस्थित होते.

आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीअहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहेसदर लॉकडाऊनची वेळ ही दुपारी 4 वाजेपर्यंतची आहेअहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येत आहेलॉकडाऊनमुळे शहरातील छोटे व्यापारीव्यावसायिकफेरीवाले यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून त्यांचे अनोनात हाल होत आहेव्यावसायिक घडी बसविण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करावेत  व्यवसायिकांना रात्री 8 वाजेपर्यंत व्यावसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावीअशी मागणी केली आहे.

यावेळी विक्रम राठोड म्हणालेगेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न निर्माण झालापरंतु सर्वांच्या प्रयत्नाने आता रुग्णसंख्या कमी होत आहेही चांगली बाब आहे.  परंतु या कालावधीत लॉकडाऊनमुळे अनेक छोट्यामोठ्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहेआता नगर शहरातील रुग्णसंख्या कमी असल्याने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता करुन व्यावसायिकांना रात्री 8 पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी मिळण्यास हरकत नाहीजिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या गृहित धरुन त्यात्या ठिकाणी लॉकडाऊन सुरु ठेवावेशिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतेअशा परिस्थितीत  आम्ही व्यावसायिकांच्या पाठिशी उभे आहोतअसे त्यांनी सांगितले.

 याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्याकोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन महत्वाचे आहेपरंतु ज्या भागात रुग्ण संख्या कमी आहेअशा ठिकाणी शिथिलता मिळणे आवश्यक आहेकारण लॉकडाऊनमुळे व्यावसायिक  त्यांच्यावर अवलंबून असणार्यांना मोठ्या त्रासास तोंड द्यावे लागत आहे

तरी नगर शहरातील लॉकडाऊन कमी करावेअशी शिवसेनेची मागणी असल्याचे सांगितले.याप्रसंगी आयुक्तांशी शिष्टमंडळाची विविध विषयांवर चर्चा होऊन याबाबत जिल्हाधिकार्यांशी बोलून निर्णय घेऊनअसे आश्वासन आयुक्तांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या