लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगरः लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर
आरोप करून आत्महत्येचा इशारा देणारी महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप व्हायरल
झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड्णवीस यानी तात्काळ
दखल घेत थेट मुख्यमंत्र्याना पत्र लिहित या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली तर भाजप
नेत्या चित्रा वाघ यांनीही यावर 'सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच
वेसण घालणे आवश्यक आहे. ' देव माणूस' म्हणून
वावरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरणाच्या बाता
मारणारे कशी वेसण घालतात? तेच आता पहायचे आहे,' असे वाघ यांनी म्हटले आहे.
आत्महत्या
केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत
असल्याची एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ती पारनेरच्या
तहसीलदार ज्योती देवरे यांची असल्याचे पुढे आले आहे. लोकप्रतिनिधींवर आरोप करून
वरिष्ठ अधिकारीही साथ देत नसल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. या क्लीपमुळे खळबळ
उडाली असून मधल्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची भेट झाल्याचे व मतपरविर्तन
झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, यासंबंधीच्या
बातम्या प्रसारित झाल्यानंतर जिल्ह्यात आणि राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.
अनेकांनी त्यांच्याशी संपर्क करून धीर देण्याचाही प्रयत्न केला आहे. सोशल
मीडियातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
भापजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही
याची याची दखल घेऊन एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी
म्हटलं आहे की, 'पारनेरच्या
तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लीप ऐकली आणि मन सुन्न झाले. हे सगळे आपल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या, जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत
आहे. आम्ही तर सवित्रीच्या लेकी आहोत, तरीही आमच्यासोबत हे
सगळे होत आहे. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणे फार गरजेचे आहे.
देव माणूस म्हणून वावरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला
सशक्तीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात तेच आता पहायचे आहे. नाही तरी या
महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय
तिच्या म्हणण्याला किंमत येते कुठे?' असेही वाघ यांनी म्हटले
आहे.
पारनेरच्या
तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ
क्लिप गंभीर आहे. त्यांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी. त्यांची दीपाली चव्हाण होता कामा नये,
जिवंतपणीच देवरे यांना न्याय मिळावा, अशी
मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी
केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या स्थानिक
पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन याप्रकरणी
चौकशीची मागणी केली व आमचा पक्ष देवरे यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार असल्याचे
सांगितले.
मनसेचा देवरे यांना पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देवरे यांना पाठिंबा
दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी त्यांना
निवेदन दिले. त्यांनी म्हटले आहे, देवरे यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू
नये. मनसे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. या ऑडिओ क्लिपची चौकशी करा आणि दोषी
लोकप्रतिनिधींवर कारवाई करा. एक महिला तहसीलदार अधिकारी सुरक्षित नसेल तर पारनेरचा
बिहार होण्यास वेळ लागणार नाही. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने पारनेर
तालुक्यातील खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झालेले आहेत. त्यामुळे एक महिला
अधिकारी तहसीलदार अशाप्रकारे आत्महत्येचा इशारा देत असेल तर यापेक्षा गंभीर काही
नाही. देवरे यांचा जबाब नोंदवून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल
करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन
डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर
तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती
रोहकले उपस्थित होते.
0 टिप्पण्या