Ticker

6/Breaking/ticker-posts

एकनाथ खडसे रुग्णालयात, प्रकृती स्थिर

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू होते.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खरंतरगेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय हे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीमध्ये अडकले आहेत. एमआयडीसी'तील भूखंड खरेदीप्रकरणात नेमण्यात आलेल्या न्या. झोटिंग समितीने आपल्या अहवालात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या किंवा पत्नीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भोसरी भूखंडप्रकरणी खडसे यांच्या जावयाला याआधीच अटक करण्यात आलेली आहे. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर खडसे यांना ४ जून २०१६ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज तीन मे २०१७ पर्यंत चालले. त्यानंतर ३० जून रोजी समितीने सरकारला अहवाल सादर केला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या