*पंकजा मुंडे यांनी केली
मोठी घोषणा
*बीडमध्ये एका कार्यक्रमात
केली घोषणा
*मराठा आरक्षणावरुन आक्रमक
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीडः 'जोपर्यंत मराठा समाजाच्या
आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्तंय गळ्यात हार घालणार नाही. ओबीसींचे
राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत मला कोणी फेटा बांधायचा नाही,' अशी घोषणा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली
आहे.
बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या
कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. मराठा आरक्षणव ओबीसी आरक्षणाच्या
मुद्द्यानरुन पंकजा मुंडे या आक्रमक झाल्या आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद
साधत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
' ज्याला खुर्चीवर बसायचं आहे,
त्याला आपण आपआपसात भांडून मरावं असं वाटतं पण छत्रपती शिवाजी
महाराज यांनी असं केलं नाही. त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं. गोपीनाथ मुंडे यांना
मी एकदा विचारलं होतं तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव समोर ठेऊन
राजकारण करत असल्याचं सांगितलं होतं,' अशी आठवणही पंकजा
मुंडे यांनी सांगितली.
दरम्यान, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी गोपीनाथ
गडावरून सुरुवात झाली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी झेंडा
दाखवल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये डॉ.
प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या
वेळी काही कार्यकर्त्यांनी 'पंकजा मुंडे अंगार हैं, बाकी सब भंगार हैं', अशा घोषणा दिल्या. त्यावर पंकजा
मुंडे चांगल्याच संतापल्या. ' अशा घोषणा कशासाठी देता,
हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? या
घोषणांनी आपलीच बदनामी होते,' असे म्हणत त्यांनी
कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले
0 टिप्पण्या