साळी समाजाचे कुलदैवत भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव निम्मित जागतिक साळी फाऊंडेशनच्या, अहमदनगर च्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी पूजन केले समवेत अरविंद धिरडे,गजेंद्र सोनवणे,कृष्णा बागडे,निलेश मिसाळ आदी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अ. नगर-साळी समाजाचे कुलदैवत व पृथ्वीवर पहिला हातमाग चालून वस्त्र निर्माण करणारे भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव कोविडच्या प्रादुर्भावाने,शासकीय नियमानुसार मंदिरात साध्या पद्धतीने व समाज बांधवानी घरोघरी साजरा केला
समाजाच्या मंदिरात जागतिक साळी फाऊंडेशन अहमदनगरच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी पूजन केले यावेळी स्वकुळसाली हितसंवर्धक मंडळाचे चेअरमन अरविंद धिरडे, विश्व् हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे , योग विद्या धामचे कृष्णा बागडे , निलेश मिसाळ आदी उपस्थित होते
नगरमधील समाजबांधवानी सकाळी घरी भगवान जिव्हेश्वराचे प्रतिमा पूजन करून आरती केली व कोविड चे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना केली.
0 टिप्पण्या