Ticker

6/Breaking/ticker-posts

विरोधकांच्या टिकेला योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ - आमदार राजळे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :विरोधकानी माझ्यावर काय टिका केली हे मला माहीती नाही, पण  त्यांच्या टिकेला योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ , असा  गर्भित इशारा  आमदार मोनीका राजळे यांनी दिला आहे.

खरवंडी कासार येथे शासकीय कोव्हीड सेटंरचे उदघाटन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी पचांयत   समिती  सभापती सुनीता दौडं , प्रातांधीकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम  वाडकर ,भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर ,भाजपा महीला आघाडी तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार ,वृध्देश्वरचे सचांलक बाळासाहेब गोल्हार, सजंय किर्तने, वामन किर्तने, खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील,  जेष्ठ नेते महादेव जायभाये ,अशोक खरमाटे ,मालेवाडीचे सरपंच आजीनाथ दराडे, भारजवाडीचे सरपंच माणीक बटुळे, योगेश अंदुरे ,दिपक ढाकणे  आदि उपस्थित होते .

यावेळी आमदार राजळे यांनी खरवंडी कासार परिसराचा कोरोना साथीच्या आजाराबाबत आढावा घेतला. प्रशासनाला स्थानीक पदाधीकाऱ्यानी मदत करावी असे आवाहन केले. या भागात जुगार सोरट मोठया प्रमाणात चालु आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे .आमची व्यथा जिल्हाधीकारी साहेबाना ही सांगीतली, आम्ही फोन करूनही उपयोग होत नाही. पोलीस प्रशासन  ऎकत नाही त्यामुळे या भागात पोलीस बंदोबस्त द्यावा,  अशी व्यथा भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मांडली .सरपंच ग्रामसेवक यांचे कोनी ऐकत नाही असा सुर उपस्थित पदाधीकाऱ्यानी काढला. त्यामुळे पोलीस निरिक्षकाशी या विषयावर  बोलने झाले आहे .याभागात पोलीस बंदोवस्त देऊ असे प्रातांधिकारी यांनी सांगीतले .

गेल्या चार पाच दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अॅड प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राजळे यांच्यावर बाराशे कोटी रुपयाचा विकास कामाचा निधी आणला मग विकास का झाला नाही ? तुमच्या सस्थां चालविणाऱ्यानी सर्वत्र गोधंळ करून ठेवला आहे हे कारभारी लायक नाहीत टक्केवारीच्या लोभापायी हे गुंड सभाळता का अशी घणाघाती टिका केली होती. त्या संदर्भात आमदार राजळे यांना मीडिया प्रतिनिधीनी छेडले असता ,त्या म्हणाल्या गुंड मि पाळत नाही व टिका केली त्या दरम्यान मि मतदार सघांत नव्हते माहीती घेऊन योग्य वेळी टिकेला सडेतोड उत्तर देऊ , असे सांगून विरोधकानी केलेल्या आरोपावर  उत्तर देण्याचे तूर्त टाळले .

लोकनेता  न्यूज ' च्या वृत्ताची दाखल

श्रेय वादाच्या वृत्तामुळे तात्काळ उद्घाटन..

"खरवंडी कासार येथिल कोव्हिड सेंटरच्या उदघाटनापुर्वीच सोशल मिडीया मध्ये उदघाटनावरून भाजपा कार्यकर्त्यावर  जोरदार आरोप झाले होते. शासकीय कोहीड सेटंर सुरु होणार असल्याने राजकीय श्रेय  घेऊ नका ..रुग्णसख्यां वाढत असताना उदघाटन का लाबले. या श्रेयवादाचे वृत्त  ' लोकनेता न्यूज ' ने कालच प्रसिद्ध केले होते. त्याची   जोरदार चर्चा झाल्यानेच  आज कोहीड सेटंरचे कोणताही डालमोल न करता औपचारीक पणे  उदघाटन झाल्याची चर्चा आज या ठिकाणी स्थितांमध्ये झडत होती."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या