लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
टोकियो: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णपदक
जिंकले. अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पदक जिंकले. पॅरालिम्पिक
स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
पदार्पणाच्या
पॅरालिम्पिकमध्ये अवनीने २४९.६ इतक्या गुणांसह सुवर्णपदक जिंकले. अवनीने फक्त
सुवर्णपदक जिंकले नाही तर तिने वर्ल्ड रेकॉर्डसह पदक जिंकले आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी अवनीने अभिनंदन केले आहे.
टोकियो
पॅरालिम्पिकमध्ये देशाला आतापर्यंत ३ पदक मिळाली आहेत. काल रविवारी भारताच्या
टेबलटेनिसपटू भविनाबेन पटेलने रौप्यपदकाची कमाई केली, तर अॅथलेटिक्समध्ये निशादकुमारने लांबउडी टी ४७ या प्रकारात आशियाई
विक्रमासह रौप्यपदकावर नाव कोरले होते. रविवारी भारताला आणखी एक पदक मिळाले होते.
पण ते पदक रोखण्यात आले आहे. थाळीफेकमध्ये भारताच्या विनोद कुमार यांनी १९.९१ मीटर
लांब थ्रो फेकला आणि आशियाई विक्रमासह तिसरे स्थान मिळवले. काही देशांनी त्यावर
आक्षेप घेतल्यामुळे हे पदक रोखण्यात आले आहे.
0 टिप्पण्या