लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: अनैतिक संबंध असलेल्या
तरुणीचा खून करून तिच्या शरिराचे तुकडे करत ते लवासा घाटात
टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेतील एक महिला बेपत्ता
असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलिसांना कौशल्याने तपास करून आरोपीला अटक
केल्यानंतर या खूनाचा उलगडा झाला. सदर तरुणी तिच्यासोबत राहण्याचा हट्ट धरत
असल्यामुळे त्याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेत वास्तव्याला असलेली ही तरुणी दहा ते बारा दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना मिळाली होती. तिच्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल होती. खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाला या तरुणीचे हनुमंत शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यामुळे पथकाने शिंदे याच्या हलचालींवर लक्ष ठेवले. त्याला संशयावरून ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने खून केल्याचे निष्पन्न झाले.
शिंदे हा मोबाइल दुरूस्तीची
कामे करतो. त्याचा विवाह झालेला आहे. काही वर्षांपूर्वी त्याची कविता सोबत ओळख
झाली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. शिंदे याने कविताला
नारायण पेठेत एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. त्याचा विवाह झाल्यामुळे तो घरी
जात होता. ही बाब कविता हिला खटकत होती. ती शिंदेला घरी जाऊ नको, माझ्यासोबत रहा, असे बोलून सतत त्रास देत
होती. शिंदे हा १२ ऑगस्ट रोजी कविताच्या फ्लॅटवर गेला. त्यावेळी तिने दिवसभर का
आला नाही, म्हणून त्याला शिवीगाळ केली. त्यावेळी रागाच्या
भरात त्याने कविताचा गळा आवळून खून केला, असे तपासात
स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
0 टिप्पण्या