*लाईट जाताच मोबाईल कंपन्यांची रेंज होते गायब
*ऑनलाईन शिक्षणाचा झाला बट्ट्याबोळ.
* बँकांसह सर्वच सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार : अखंडीत सेवाचा लाभ घेण्यासाठी त्वरीत रिचार्ज करा म्हणाऱ्या मोबाईल सेवा देणाऱ्या बीएसएनएल व रिलायन्स कंपनीची सेवा पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात विज खंडीत झाल्यानतंर तात्काळ खंडीत होत असल्याने मोबाईल धारकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे"इंटरनेटची झाली तऱ्हा; ऑनलाईनचे वाजले की आता बारा..!" अखंडीत सेवांचा 'खंडीत' लाभ घेण्यासाठी त्वरीत रिचार्ज करा ..! असाच प्रकार अनुभवयास येत आहे.
मोबाईल हा मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. दैनदिन जिवनात पदोपदी मोबाईलची गरज पडत आहे. आणि मोबाईल नेटवर्क गेल्यास प्रत्येक व्यक्तीला प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो .गेल्या काही वर्षापासुन शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयाचे कामकाज देखील ऑनलाईन झाले आहे .
बॅका, पोस्टऑफीस , ग्रामपंचायत सेतु केंद्र , यांचे कामकाज ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे कागद रंगवायचे काम बंद झाले. कोरोना साथ रोगाच्या महामारीमुळे शाळा, महाविद्यालये, क्लासेस अंन पर्यायानं विदयार्थाचे शिक्षणही ऑनलाइन अभ्यासक्रमातुन चालू आहे . खाजगी कंपनीत काम करणाऱ्या परंतु कोरोनाच्या महामारीमुळे शहरातुन गावी आलेल्या कर्मचाऱ्याचे वर्क फ्रॉम होम चालु आहे. याशिवाय दै नंदिन संवाद,परस्पर संपर्क मोबाईल बंद असला की पूर्णपणे विस्कळीत होतो. म्हणजेच संपूर्ण मानवी जीवनचक्रच ऑनलाईन अवलंबून झाले आहे. मात्र भारत सचांर निगम व रिलायन्स जिओचे नेटवर्क सेवा वारंवार खंडीत होत असल्याने लहान-मोठ्यांची गैरसोय होत आहे
कुठल्याही मोबाईल कंपनीचे रिचार्ज संपत आले की आठ दिवस आधीपासून रिचार्ज करण्याचे संदेश ग्राहकांना दिले जातात . रिचार्ज सपंल्यानतंर ग्राहक सेवा क्षणाचा विलंब न करता बंद केली जाते .मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीला घ्यायचे कळते मग ग्राहक हक्क सेवा दयायचे का कळत नाही ? पुर्वी विज खंडीत झाल्यानतंर बॅटऱ्या वर टॉवर कार्यान्वयीत राहयचे बॅटऱ्या डिजार्च झाल्यावर जनरेटर चालु असायचे. मात्र आता बॅटऱ्या ही खराब झाल्या, जनरेटर ही चालु नाही अधीकृत कुणी कर्मचारी ही नाही. दाद - फिर्याद मागायची कोणाकडे अशी पंचाईत झाली आहे.
खरवंडी कासार रिलायंन्स जिओ टॉवरची पाहणी केली असता टावर परिसरात गवताचे साम्राज्य पसरलेले आहे टॉवरच्या बॅटऱ्या खराब आहेत. महावितरणचा ट्रान्सफार्मर नादूर अवस्थेत दोन फेज वर कार्यन्वयीत आहे. जनरेटर काटया कुपट्या आणि गवतात अडकलेले आहे, तर बिएसएनएल कपंनीच्या बॅटऱ्या खराब झाल्या आहेत, डिझेल जनरेटर बंद आहे. या कपंनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून दखल घेणे गरजेचे आहे.
बीएसएनएल पाथर्डी कर्यालाकुदून दुर्लक्ष
खरवंडी कासार येथिल बिएसएनएल कार्यालयात कर्मचारी नाही टॉवर साठी असणाऱ्या बॅटऱ्याचे आयुष सपंले आहे येथे जनरेटर आहे पण ते कधी ही चालु केले जात नाही याबाबत पाथर्डी कार्यालयाचे उपमडंल अधीकारी गजेंद्र पिसे यांच्या कडे तक्रार करून ही ते दखल घेत नाही व फोन ही उचलत नाही अशा नागरिकाच्या तक्रारी आहेत.
ग्राहक मचांत धाव घेणार
कोरोनाच्या साथिमुळे विदयार्थाचे आधीच मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाईनच्या माध्यमातुन शिक्षण सुरू झाल्याने मुलासाठी स्वतंत्र मोबाईल घरोघरी घेतल्या गेले. आर्थिक घडी विस्कटली असतानाही शिक्षणामुळे मोबाईलचे रिचार्ज करावेच लागते. पण उपयोग होत नाही .खाजगी कंपन्याचे अधीकारी कोण कार्यालय कोठे हे सर्वसामान्याना माहीती नसते .म्हणुन आता या कपंन्याच्या विरोधात ग्राहक मचांकडे धाव घेणार असल्याचे ढाकणवाडीच्या सरपंच सौ. सुरेखा ढाकणे यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या