Ticker

6/Breaking/ticker-posts

कांदा आणि लसूण संशोधन संचनालयात भरती, जाणून घ्या डिटेल्स

 

२८ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

अधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे:  पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत यंग प्रोफेशनल आणि ज्युनिअर रिसर्चर पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवाराकडे अॅग्रीकल्चरमध्ये पदव्युत्तर डिग्री असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवाराला ३५ हजार पर्यंत दरमहा पगार देण्यात येईल.

ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा प्रकल्प संपण्याच्या मुदतीपर्यंत असणार आहे. उमेदवाराच्या कामाची गुणवत्ता पाहून कामाचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढविण्यात येऊ शकतो.

२८ ऑगस्टपर्यंत उमेदवाराचे किमान वय २१ आणि कमाल ४५ वर्षे असणे गरजेचे आहे. उमेदवार यापूर्वी कुठे नोकरी करत असेल तर त्या संस्थेतून ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने शिक्षण, वयोमर्यादा हे तपशील तपासायला हवे.

या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसंदर्भात नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवाराची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल. शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांनाच ऑनलाइन मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल

निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू होताना मेडिकल सर्टिफिकेट तसेच इतर मूळ कागदपत्र पडताळणीसाठी सोबत आणणे आवश्यक आहे. त्याआधी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

उमेदवारांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायला हवे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी recruitment.dogr@icar.gov.in या ईमेल आयडीवर अर्ज करायचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या