लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह
वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक
करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे.
शिवसेनेचे
नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी
नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना
झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले
आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात
विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर
बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात
आले आहेत.
दरम्यान, चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून अटक
टाळण्यासाठी नारायण राणे प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. महाडमध्येही
नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
तिसऱ्या लाटेचा आवाज त्यांना कुठून आला? आणि ती सुद्धा लहान मुलांना धोका आहे
म्हणायचे आणि लोकांना घाबरवायचे. अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. त्याला बोलायचा
अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून
बोल म्हणावे. त्या दिवशी नाही का, किती वर्षे झाली देशाला
स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव
काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय, देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
0 टिप्पण्या