लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अहमदनगर विद्यमाने आयोजीत भटके विमुक्त डोंबारी समाज घोडेगांव ता .नेवासा येथील पाला वरील उत्कर्ष बालसंगोपन संस्था येथील मुलांना खाऊचे वाटप व त्यांच्या पालावर टाकण्यास पावसाळी ताडपत्र्याचे वितरण अ नगर नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले .
याप्रसंगी नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनिल निकम ,महीला जिल्हा अध्पक्ष सौ वनीताताई बिडवे , जिल्हायुवा अध्यक्ष श्रीनिलेश जी पवळे, जिल्हा सचीव बापूसाहेब औटी ' शहर अध्यक्ष श्री श्रीपाद जी वाघमारे तसेच नाभिक महामंडळाचे सक्रीय सदस्य श्री . रमेश जी बिडवे व नेवासा येथील युवा जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुदर्शन राऊत सर यांच्या उपस्यीतीत होते.
उत्कर्ष बालसंगोपनचे संस्थापक श्री .युवराज गुंड यांच्या मार्गदर्शनानुसार डोबांरी समाजातील भटक्या समाजाला मदत करण्यात आली .उपस्थीतांचे समाजातील लोकांनी आभार मानले
0 टिप्पण्या