Ticker

6/Breaking/ticker-posts

यंदा प्रतीक्षा संपली; म्हाडाची सर्वसामान्यांसाठी ९००० घरांची लॉटरी..!

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: करोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी घरे देत स्वप्न साकार करणारी म्हाडाच्या घरांची लॉटरी दसऱ्याला काढण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या लॉटरीद्वारे एकूण ९ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लॉटरीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी ६५०० घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी २००० घरे आणि २० टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या ५०० घरांचा समावेश आहे.

९ हजार घरे निम्न आणि मध्यम वर्गीयांसाठी

या एकूण ९ हजार घरे निम्न आणि मध्य वर्गीयांसाठी असणार आहेत. ही घरे ठाणे, मीरारोड, वर्तकनगर, कल्याण, वडवली, गोथेघर आणि विरार बोळिंज नाका येथे उपलब्ध होत आहेत. मीरारोड येथे मध्यम वर्गीयांसाठी २ बीएचकेची १९६ घरे उपलब्ध होत आहेत. तसेच ठाण्यातील वर्तकनगरमध्ये ६७ दुकानेही उपलब्ध होत आहेत.

घरांची किंमत ३८ ते ४० लाख रुपये

कोकण मंडळाच्या लॉटरीद्वारे, ठाण्यातील वर्तकनगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी ६७ घरे उपलब्घ असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ ३२० चौरस फूट इतके असणार आहे. तर, या घरांची किंमत ३८ ते ४० लाख इतकी असणार आहे. वडवली येथे २९, कासारवडवली येथे ३५० घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होत आहेत. या घरांची किंमत १६ लाखांच्या आसपास असणार आहे. विरार येथे १ हजार ३०० घरे उपलब्ध होत आहेत. यातील एक हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत, तर उर्वरित घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या