लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कृष्णनाथ अंदुरे
खरवंडी कासार : पाथर्डी पासुन पुर्वेला ३५ कि मी असणाऱ्या एकनाथवाडी येथे ८५ वर्षापासुन श्रीकृष्ण जन्म अष्टमी साजरी होत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधत्मक नियमामुळे हा सोहळा या वर्षी साध्या पदधतीने साजरा होणार असला तरी येथिल सोहळयाला मोठी प्राचीन धार्मिक परपंरा आहे.
१९३२ साली एकनाथवाडी व मुंगूसवाडे गावाच्या शिवारात बापू सानप यांच्या पांढरीच्या जमीनीची नागरंट चालु असताना गया उत्तर प्रदेश येथील विष्णु मुर्ती सारखी हुबेहुब ७ फुट उंचीची मुर्ती सापडली .त्यानतंर हि मुर्ती मुंगूसवाडे गावाच्या ग्रामस्थानी बैलगाडीतून आणण्याचा प्रयत्न केला .परंतू ति मुर्ती ५० व्यक्तीलाही हालली नाही . मात्र ग्रामदैवत असणाऱ्या मच्छींद्रनाथाच्या टेकडी जवळ वसलेल्या एकनाथवाडी ग्रामस्थाना यश आले .त्यांनी हि मुर्ती एकनाथवाडी येथे नेऊन विधिवत स्थापन केली. तेव्हापासुन येथे श्रीकृष्ण जन्म अष्टमी साजरी होते . सन १९९१ साली विष्णू मुर्ती मंदीराचे काम चालु असताना पुन्हा बापू सानप यांच्या शेतात १० मुर्ती सापडल्या. हा परिसर महाभारत कालीन जेष्ठ अभ्यासक भा .द. खेर इतिहास संशोधक सुरेश जोशी, सेतू माधाराव पगडी आदी दिग्गजानी संशोधन साहित्यात या स्थाणाचा उलेख केला आहे..पुरातत्व खात्याने मुर्तीसह परिसराचा उत्खननासह अभ्यास करून संशोधन करावे ,अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातुन होत आहे.
काही वर्षापुर्वी मुंगूसवाडे व एकनाथवाडी हे एकच गाव होते. मच्छींद्रनाथाच्या टेकडी भोवती एकनाथवाडी हे गाव वसले आहे हा भाग नाथाची तपोभूमी असुण दडां कारण्य प्रदेश म्हणून प्राचीण धर्मग्रंथामध्ये या भागाचा उलेख आहे . येथिल सापडलेल्या मुर्तीचा अभ्यास इतिहास संशोधक सुरेश जोशी यांनी अनेक वेळा भेट देऊन या मुर्तीचा अभ्यास केला आहे. देशपातळीवर या परिसराला. महत्व असून उत्खनन सशोधंन व परिसर अभ्यासातुन देशाच्या प्राचीण वारस्याचे नव्याने संदर्भ सापडील असे त्यानी भेटी दरम्यान गावकऱ्याना सांगीतले होते.
सन १९३२पासुन येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीकृष्ण जन्म अष्टमी कार्यक्रम होतो . सन१९९१ या मंदीराचा ग्रामस्थानी जिर्णोधार केला सण १९९१ ला सापडलेल्या अन्य मुर्तीची पुरेशी माहीती ओळख ग्रामस्थाना नसुण मुर्तीच्या बाह्य वर्णना नूसार सुर्य ,बजरंग ,खंडोबा, काळभैरव असे देव समजूण ग्रामस्थ पुजा करतात त्यापैकी ४ते५ मुर्ती बद्दल काही माहीती व मेळ लागत नाही. महाभारत काळात अर्जुनाचे त्याचाच मुलगा बब्रुवाहन नावाच्या मुलाशी युध्द झाले व त्यात आर्जुनाचा पराभव झाला हि युद्ध भूमी टाकळी मानुर पारिसर जवळ आहे . सापडलेल्या मुर्तीचे दक्षीण भारताच्या मुर्तीशी साम्य आहे. येथील मुर्ती सापडलेल्या ठिकाणी महापूर भुकंप अशा नैसर्गीक आपत्ती मुळे जमीणी खाली गाव गाडले गेले असल्याचा तर्क ही अभ्यासक करत असले तरी मुर्तीचा दगड मुर्ती वरिल कोरीव काम यावरून त्या दिड हजार वर्षापुर्वीचा कालखंडाशी मिळते जुळते आहे .
"या ऐतिहासीक व तिर्थक्षेत्राचा दर्जा या ठिकाणाला मिळावा मुर्ती या सापडलेल्या ठिकाणाचा शेताच्या भोवतालचा परिसराचा पुरातत्व खात्याने अत्याधुणीक यंत्रसामुगीने अभ्यास करावा "
-देवीदास खेडकर माजी पंचायत समीती सदस्य, जिल्हा अध्यक्ष मनसे
0 टिप्पण्या