लोकनेता न्यूज
खरवंडी कासार :जिल्हाधीकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार खरवंडी कासार येथे उदया पासुन कोव्हीड सेटंर चालु होणार आहे. त्यामुळे पॉझीटिव्ह व्यक्तीने यापुढे घरी आयसोलेट न होता कोहीड सेटंर मध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत असे आवाहन गटविकास अधीकारी शितल खिंडे यांनी केले आहे.
खरवंडी कासार येथिल संत भगवान बाबा अध्यापक विद्यालयात हे कोहीड सेटंर चालु होणार असुण प्रांताधीकारी देवदत्त केकाण तहसिलदार श्याम वाडकर गटविकास अधीकारी शितल खिंडे यांनी आज जागेची पहाणी केली .
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष माणीक खेडकर ,खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील , भाजपा तालुका उपध्यक्ष सजंय किर्तने , चेअरमन वामन किर्तने , ग्रामपंचायत सदस्य तथा मुख्याध्यापक सघंटनेचे जिल्हा उपध्यक्ष मिथुन डोगंरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश अंदुरे ,ग्रामविकास अधीकारी अशोक दहीफळे , कामगार तलाठी जालीदंर सागंळे उपस्थित होते .
या भागात जादा प्रमाणात कोरोना ससंर्ग होत असुन कोरोना पॉझीटिव्ह व्यक्तीने यापुढे घरी आयसोलेट न होता कोहीड सेटंर मध्ये दाखल व्हावे व उपचार घ्यावेत यासाठी सर्व पदाधीकाऱ्यानी प्रयत्न करावेत असे आवाहनही गटविकास अधीकारी शितल खिंडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या