लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल्स
यांना शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीच महत्वाची आणि सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत
संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स
आणि मॉल्सच्या नियमांमध्ये काही शिथिलता देण्याबाबत टास्क फोर्स लवकरच नवी नियमावली तयार करणार आहे,
अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, धार्मिक,
सामाजिक कार्यक्रम आणि प्रार्थना स्थळांना इतक्यात शिथिलता देता
येणार नसल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात येणारी संभाव्य तिसरी लाट, त्यानुसार ऑक्सिजनची लागणारी गरज,
लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे, तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही
क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून निर्बंधात शिथिलता आणणे, यासंदर्भात टास्क फोर्सच्या या बैठकीत मुख्यत्वे चर्चा झाल्याचे
मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
मंदिरे, धार्मिक स्थळांना निर्बंधाबाबत काय?
आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्या तिसरी लाट
आणि राज्य सरकारची तयारी यावर चर्चा होत असताना राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्सबाबत चर्चा झाली.
यांना निर्बंधात कशा प्रकारे शिथिलता देण्यात येईल यांचा आढावा घेऊन नवी नियमावली
तयार करण्यात येणार आहे. मात्र ही चर्चा होत असताना राज्यातील मंदिरे आणि धार्मिक
स्थळांसाठीच्या नियमांमध्ये शिथिल द्यायची किंवा कसे याबाबत मात्र टास्क
फोर्समध्ये कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कालच्या
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संपूर्ण करोना स्थितीचा आढावा
घेतला. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ
प्रदीप व्यास, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर
शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर
विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत
नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर
अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर
उदवाडिया हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या